नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकारने फक्त एक आवाहन केल्याने एलन मस्कला Elon Mask यांना जोरदार झटका बसला आहे. एलन मस्क यांची कंपनी Starlink ने सॅटेलाइट इंटरनेट सर्विससाठी सब्सक्रिप्शन प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, आता सरकारने देशातील लोकांना या स्टारलिंक इंटरनेट सेवेपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, एलन मस्क यांच्या स्टारलिंकला भारतात सॅटेलाइट इंटरनेट देण्यासाठी अजून लायसन्स मिळाले नाही. त्यामुळे जनतेला आवाहन आहे की, स्टारलिंकच्या इंटरनेट सर्विस सब्सक्रिप्शनला खरेदी करू नये. असे केल्यास लोकांचे नुकसान होऊ शकते. दूरसंचार विभागने हे म्हटले दूरसंचार विभागने सुद्धा एलन मस्क यांच्या स्टारलिंकला भारतात अद्याप लायसन्स मिळाले नाही, असे सांगत मस्क यांच्या कंपनीच्या रेग्युलेटरी प्रक्रियेला फारसं महत्व दिलेले नाही. मस्क यांच्या स्टारलिंकच्या इंटरनेट सेवेसाठी सरकारकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे. ती मंजुरी अद्याप मिळालेली नाही. देशात सध्या अनेक खासगी टेलिकॉम कंपन्या आहेत. एलन मस्क हे भारतात अन्य कंपन्यांच्या तुलनेत फास्ट इंटरनेट देण्याच्या तयारीत होते. परंतु, आता त्यांना जोरदार झटका बसला आहे. ५००० प्री बुकिंगचा आकडा केला पार एलन मस्क यांच्या स्टारलिंक ने नुकतेच इंटरनेट सेवेसाठी प्री बुकिंग सुरू केली होती. यानंतर सरकारकडून हे सब्सक्रिप्शन खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. स्टारलिंक ने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, भारतात आपली सेवा देण्यासाठी उत्सूक आहोत. देशात प्री बुकिंगची संख्या ५००० पार केल्याची माहितीही कंपनीने दिली होती. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p7TokC