नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट ने ‘Love it or return it' या नवीन प्रोग्रामची सुरुवात केली आहे. या प्रोग्राम अंतर्गत ग्राहक वापरण्याचा अनुभव घेऊ शकतात व फोन न आवडल्यास १५ दिवसात परत देखील करू शकतील. यूजर्सला पूर्ण पैसे रिफंड देखील मिळतील. वाचा: ‘Love it or return it' प्रोग्रामसाठी Flipkart ने Samsung सह भागीदारी केली आहे. या भागीदारी अंतर्गत आणि हे स्मार्टफोन्स येतात. यूजर्स या प्रोग्राम अंतर्गत फोन ऑर्डर करू शकतात व न आवडल्यास १५ दिवसात परत देखील करू शकतील. फ्लिपकार्टवरून Samsung Galaxy Z Fold 3 आणि Samsung Galaxy Z Flip 3 ला खरेदी केल्यास परत करण्याचा पर्याय मिळेल. जर तुम्हाला फोन आवडला नाही तर परत करू शकता. तुम्ही फोन रिटर्न करण्याची रिक्वेस्ट टाकल्यानंतर फ्लिपकार्टद्वारे फोनची क्वालिटी चेक केली जाईल. कंपनी चेक करेल की फोन पूर्णपणे काम करत आहे की नाही. फोन क्वालिटी चेकमध्ये पास झाल्यास पूर्ण पैसे अकाउंटमध्ये रिफंड होतील. ही ऑफर सध्या बंगळुरू, हैद्राबाद, पुणे, दिल्ली, मुंबई, गुरुग्राम, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई आणि वडोदरा या शहरातील ग्राहकांसाठी आहे. फोन रिटर्न कसा कराल? तुम्हाला या प्रोडक्ट्सला रिटर्न करायचे असल्यास रिटर्न रिक्वेस्ट वेब लिंकवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर मोबाइलचा IMEI नंबर टाकावा लागेल. त्यानंतर पर्सनल, डिव्हाइस आणि बँकेची माहिती द्यावी लागेल. आता कंपनीकडून एक तिकीट नंबर तयार केला जाईल. फ्लिपकार्टकडून एक ईमेल पाठवला जाईल. याद्वारे फोन वर्किंग कंडिशनमध्ये आहे की नाही, हे तपासले जाईल. यासाठी तुम्हाला एक अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. तपासणी पूर्ण झाल्यानंतर पिकअपसाठी फोन येईल. त्यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशन पूर्ण करून फोन कलेक्ट केला जाईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wnd7QH