नवी दिल्लीः गेल्या काही महिन्यापासून ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शनची डिमांड खूप वाढली आहे. याला डोळ्यासमोर ठेवून कंपन्या आता युजर्संना आकर्षक आणि बेस्ट बेनिफिटचे प्लान ऑफर करीत आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या प्लान्स मध्ये डेटा आणि कॉलिंगचा फायदा दिला जात आहे. जर तुम्हाला एक बेस्ट बेनिफिटचा ब्रॉडबँड प्लान हवा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी खास माहिती देत आहोत. आज आम्ही तुम्हाला , आणि एअरटेलच्या काही सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लान्स संबंधी माहिती देत आहोत. या प्लानमध्ये 3300GB पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सोबत अनेक अतिरिक्त बेनिफिट दिले जात आहेत. या प्लानची सुरुवातीची किंमत ४०० रुपयांपेक्षा कमी आहे, जाणून घ्या डिटेल्स. जिओचा ३९९ रुपयाचा ब्रॉडबँड प्लान जिओचा हा सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लान आहे. ३० दिवसाची वैधता असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला ३.३ टीबी म्हणजेच ३३०० जीबी डेटा मिळेल. हाय स्पीड इंटरनेट डेटाच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट सोबत येतो. प्लानच्या सब्सक्राइबर्सला कंपनी जिओच्या अनेक सर्विसेजचे फ्री अॅक्सेस देत आहे. एअरटेल एक्सट्रीमचे ४९९ रुपयाचा ब्रॉडबँड प्लान एअरटेलचा हा प्लान युजर्ससाठी कंपनीचा सर्वात स्वस्त प्लान आहे. या प्लानमध्ये तुम्हाला 40Mbps ची स्पीड ने अनलिमिटेड डेटा मिळेल. प्लानमध्ये कंपनी देशात सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा देत आहे. ३० दिवसाच्या वैधते सोबत येणाऱ्या या ब्रॉडबँड प्लान मध्ये अनेक पॉप्यूलर ओटीटी अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळतो. बीएसएनएलचा ४४९ रुपयाचा ब्रॉडबँड प्लान कंपनीच्या या प्लानमध्ये तुम्हाला 30Mbps च्या स्पीडने ३३०० जीबी डेटा मिळेल. डेटा लिमिट संपल्यानंतर प्लानमध्ये मिळणारी स्पीड कमी होवून 2Mbps होते. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात कंपनी देशात कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट ऑफर करीत आहे. बीएसएनएलच्या या प्लानमध्ये तुम्हाला कोणतेही ओटीटी सब्सक्रिप्शन मिळत नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qhJdfP