नवी दिल्लीः जर तुम्हाला एक नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा विचार असेल तर रियलमी फेस्टिव डेज सेल तुमच्यासाठी खास ऑफर घेवून आला आहे. ८ नोव्हेंबर पर्यंत सुरू असलेल्या या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर ४ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. जर तुम्हाला या सेलमध्ये फोन खरेदी करताना MobiKwik किंवा Paytm वरून पेमेंट केले तर ५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक सुद्धा मिळणार आहे. जाणून घ्या डिटेल्स. या सेलमध्ये कंपनी कोणत्या स्मार्टफोन्सवर कोणती ऑफर देत आहे. रियलमी GT Neo 2 रियलमीच्या या 5G फोन वर ४ हजार रुपयाची सूट दिली जात आहे. ४ हजार रुपयाच्या डिस्काउंट ऑफर प्रीपेड ऑर्डरसाठी आहे. या ऑफर सोबत फोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंट तुम्हाला ३१ हजार ९९९ रुपयाच्या ऐवजी २७ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येईल. कंपनीचा हा फोन 20Hz च्या E4 AMOLED डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसर सोबत येतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ६४ मेगापिक्सलचा AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. रियलमी 8i ४ जीबी रॅम आणि ६४ जीबीचे इंटरनल स्टोरेजच्या या फोनची किंमत कंपनीच्या वेबसाइटवर १३ हजार ९९९ रुपये आहे. ऑफर अंतर्गत प्रीपेड पेमेंट केल्यानंतर हा फोन १ हजार रुपयाच्या सूट सोबत ऑर्डर केला जावू शकतो. तर वॉलेट पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ५०० रुपयांपर्यंत एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजच्या सोबत येणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G96 प्रोसेसर दिला आहे. 120Hz च्या रिफ्रेश रेट सोबत फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा AI ट्रिपल कॅमेरा सेटअप सोबत येतो. रियलमी नार्जो ३० रियलमीचा हा फोन या सेलमध्ये २ हजार रुपयाच्या सूट सोबत उपलब्ध आहे. हा प्रीपेड डिस्काउंट ऑफर फोनच्या व्हेरियंट साठी आहे. डिस्काउंट नंतर फोनची सुरुवातीची किंमत १३ हजार ४९९ रुपया ऐवजी ११ हजार ४९९ रुपये झाली आहे. कंपनीचा हा फोन 48MP AI ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 5000mAh ची बॅटरी सारखे फीचर्स सोबत येतो. रियलमी C25Y रियलमीचा हा पॉप्यूलर स्मार्टफोन सेलमध्ये १ हजार रुपयाच्या सूट सोबत उपलब्ध आहे. सूटनंतर या फोनची सुरुवातीची किंमत १० हजार ९९९ रुपया ऐवजी ९९९९ रुपये झाली आहे. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास तुम्हाला ७५० रुपयाचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा या फोनमध्ये दिला आहे. ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ८ जीबी पर्यंत रॅम असलेल्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ERSuiq