नवी दिल्ली : आज प्रत्येकाच्या हातात आहे. स्मार्टफोनमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. मात्र, डिव्हाइसचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. विशेष म्हणजे तुम्ही काय डाउनलोड करत आहात व कोणत्या अ‍ॅप्सला परवानगी दिली आहे, हे तपासावे. स्कॅमर्स, हॅकर्स एडवर्टाइजर्सची सतत डिव्हाइसवर लक्ष असते. वाचा: मॅलवेअर व्यतिरिक्त असे अनेक आहेत, जे वारंवार जाहिरात दाखवून पैसे कमवतात. त्यामुळे डिव्हाइसला सुरक्षित ठेवण्यासाठी काही विशेष गोष्टींची काळजी घ्यायला हवी. फोनसोबत येणाऱ्या मुळे स्पेस आणि स्टॅबिलिटीची समस्या जाणवत असते. अशा अ‍ॅप्सला शक्य असल्यास अनइंस्टॉल करावे. काही अ‍ॅप्स डेटा देखील कलेक्ट करतात व याचा वापर करून फोनवर जाहिराती दाखवतात. तुम्ही फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन डाउनलोड केलेले अ‍ॅप्स पाहू शकता. यात मॅलवेअर आणि स्पायवेअरचा समावेश असू शकतो. अशा अ‍ॅप्सला त्वरित डिलीट करावे. तसेच, अकाउंटचा पासवर्ड देखील काही महिन्यांनी बदलत राहावा. यामुळे तुमचे अकाउंट सुरक्षित राहिल. तुम्ही जर प्ले स्टोर वगळता इतर ठिकाणांहून अ‍ॅप्स इंस्टॉल करत असाल तर सावध व्हा. तसेच अननोन सोर्सवरून अ‍ॅप्स इंस्टॉल बंद करा. त्यामुळे तुमच्या परवानगीशिवाय फोनमध्ये अ‍ॅप्स डाउनलोड होणार नाही. जर तुम्ही APK फाइलचा वापर करून अ‍ॅप्स इंस्टॉल करत असाल तर डिव्हाइससाठी धोकादायक आहे. महत्त्वाचे म्हणजे नवीन फोन घेतल्यानंतर गुगल फाइंड सर्व्हिस ऑन करा. जेणेकरून, फोन हरवल्यानंतर तुम्हाला डिव्हाइस शोधण्यास मदत होईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CX9iDi