मुंबई :टीव्हीच्या पडद्यावर डॉ. निलेश साबळेची ‘हवा’ आहे. अभिनेता, दिग्दर्शक, मिमिक्री कलाकार, पटकथा लेखक, सूत्रसंचालक अशा विविध भूमिकांमध्ये निलेशनं आपला ठसा उमटवला आहे. अष्टपैलू कलाकार असलेला निलेश आता ‘' या कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. ‘’तून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा निलेश आता या नव्या कार्यक्रमातून मनोरंजनासाठी तयार आहे. यातील प्रसंगांच्या नवनव्या कल्पना कशा सुचतात, ते सांगताना निलेश म्हणाला, की 'मी सतत आजूबाजूचं निरीक्षण करत असतो. माणसांकडे बारकाईनं पाहतो. त्यातून सतत काही ना काही शोधत राहणं सुरू असतं. या सगळ्यातूनच हे सुचत जातं. सतत माणसं बघायची, माणसं शोधत राहायची. अगदी रिक्षात जरी मी बसलो तरी मी बघायचो की, तो रिक्षा कशी चालवतो? त्यात काही गंमत घडतेय का? लहानपणापासूनच मला विनोदाची फार आवड होती. शाळेत असताना गॅदरिंगला मी स्वत:च छोट्या छोट्या गोष्टी लिहायचो व सादर करायचो. पुढे कॉलेजला गेल्यावरही विनोदावरील प्रेम वाढतच गेलं. दिवसभर डोक्यात विचार सुरूच असायचे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yPBjwb