-मुंबई: सिनेमा, नाटक आणि टीव्ही या तीनही माध्यमांत आपला ठसा उमटवलेला अभिनेता-लेखक-दिग्दर्शक सध्या एका वेगळ्या कारणामुळं चर्चेत आला आहे. सेलिब्रिटी आणि त्यांच्या मुलांची नावं नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमधील रॉयल जोडी नवाब आणि त्याची पत्नी यांनी त्यांच्या मुलाचं नाव चाहत्यांसोबत शेअर केलं. यानंतर दोघांवर प्रचंड टीका झाली , नेटकऱ्यांनी दोघांना ट्रोल केलं. करिना आणि सैफ यांनी त्याच्या दुसऱ्या लेकाचं नाव जहांगिर असं ठेवलं. त्यावरून सोशल मीडियावर चर्चा सुर होती. आता मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर याच्या मुलाचं नावही जहांगिर असल्याचं समोर आल्यानंतर पुन्हा या नावाची चर्चा सुरू आहे. चिन्मयनं मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. त्या्मुळं तू मुलाचं नाव जहांगीर नको ठेवायला होतं, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. चिन्मयनं 'फत्तेशिकस्त' या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट शिवरायांच्या मोहिमेवर आधारित होता. प्रेक्षकांकडून चिन्मयच्या या भूमिकेचं कौतुक करण्यात आलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ecjwpv