Full Width(True/False)

ड्युअल रियर कॅमेरासह Samsung Galaxy Tab S8, Tab S8+ आणि Tab S8 Ultra लाँच, पाहा किंमत फीचर्स

नवी दिल्ली: Samsung ने आपल्या मेगा इव्हेंटमध्ये Samsung Galaxy Tab S8, Tab S8+ आणि Ultra लाँच केले आहे. हे टॅब अनेक उत्तम वैशिष्ट्यांसह येतात. ची किंमत $६९९.९९ (अंदाजे ५२,४०० ) पासून सुरू होते. तर , Samsung Galaxy Tab S8+ ची किंमत $८९९. ९९ (अंदाजे ६७,३०० ) पासून सुरू होते. Samsung Galaxy ची किंमत $१,०९९९.९९ (अंदाजे ८२,३०० रुपयांपासून ) पासून सुरू होते. Galaxy Tab S8 ची ९ फेब्रुवारीपासून रात्री १० वाजता प्री-ऑर्डर करता येईल. त्याची विक्री २५ फेब्रुवारीपासून अमेरिका, युरोप आणि दक्षिण कोरियामध्ये विक्रीसाठी केली जाईल. Samsung च्या या Galaxy Tab डिव्हाइसेसमध्ये युजर्सना कामी येतील अशी काही जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. जाणून घ्या याबद्दल सविस्तर. वाचा: Samsung Galaxy Tab S8 मध्ये ११-इंचाची LTPS TFT स्क्रीन आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन २५६०१६०० आहे. त्याचा रिफ्रेश दर रेट १२० Hz आहे. फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हे उपकरण Android 12 वर चालते. मागील बाजूस फ्लॅशसह ६ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड सेन्सरसह १३-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी १२ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy Tab S8 मध्ये स्टोरेज आणि रॅम असे दोन प्रकार आहेत. Samsung Galaxy Tab S8 मध्ये ८ GB RAM आणि १२ GB RAM चा पर्याय आहे. स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर, १२८ GB इंटरनल मेमरी आणि २५६ GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ते १ TB पर्यंत वाढवता येते. त्याच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. डिव्हाइसमध्ये ८००० mAh ची बॅटरी देण्यात आली असून ती ४४ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, LTE, WiFi 6E, Bluetooth ५.२ सपोर्ट आहे. Samsung Galaxy Tab S8+ मध्ये १२० Hz रिफ्रेश रेटसह १२.४ -इंच सुपर AMOLED स्क्रीन आहे. यात १०,०९० mAh बॅटरी आहे. इतर स्पेसिफिकेशन Samsung Galaxy Tab S8 सारखेच आहेत. तर, Samsung Galaxy Tab S8 Ultra चे वैशिष्ट्य टॅब S8 आणि Tab S8+ पेक्षा बरेच वेगळे आहेत. टॅब S8 अल्ट्रामध्ये १२० Hz रिफ्रेश रेटसह १४.६ इंच सुपर AMOLED स्क्रीन आहे. हे डिव्हाइस Android 12 वर देखील चालते. टॅब S8 अल्ट्रामध्ये ८ GB/१२ GB/१६ GB रॅमचा पर्याय आहे. यात १२८GB/२५६GB/५१२ GB चा स्टोरेज पर्याय आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ते १TB पर्यंत वाढवता येते. यात ११,२००mAh ची बॅटरी आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/JKwog3y