Full Width(True/False)

मिनिटात फुल चार्ज होईल बॅटरी, १५०W चार्जिंग सपोर्टसह येणारा फोन आणणार ‘ही’ कंपनी

नवी दिल्ली: वारंवार स्मार्टफोनला चार्ज करायला कोणालाच आवडत नाही. यावर पर्याय म्हणून कंपन्या फोनमध्ये जास्त क्षमतेची बॅटरी देत आहे. मात्र, आता याही पुढे जाऊन लवकरच अवघ्या काही मिनिटात फोन चार्ज होतील. कारण, अपकमिंग फोनमध्ये ८० वॉट अथवा १५० वॉट चार्जिंग स्पीडचा सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. १५० वॉटमध्ये त्याच १६० वॉट चार्जिंग ब्रिकचा (चार्जर) वापर केला जाईल, ज्याचा ओप्पोद्वारे वापर केला जात आहे. याबाबतची माहिती डिजिटल चॅट स्टेशनने वीबोवर एक पोस्ट करून दिली आहे. वाचा: बाजारात सध्या १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारे उपलब्ध आहेत, जे केवळ १५ मिनिटात ४००० ते ५००० एमएएच बॅटरी फुल चार्ज करण्यास सक्षम आहे. १२० वॉटसह येणारे सर्व फोन्स हे , आणि या चीनी ब्रँड्सचे आहेत. १२० वॉट + चार्जिंग सपोर्टसह नॉन अपकमिंग ऑफरिंगपैकी एक REDMAGIC 7 Pro आहे. यात १२५ वॉट सुपर फ्लॅश चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. तसेच, हा १६५ वॉट गॅलियम नाइटट्राइड चार्जरसह येतो. यात ५००० एमएएचची बॅटरी दिली असून, जी केवळ १५ मिनिटात १०० टक्के चार्ज होते. रियलमी, शाओमी आणि नूबिया सारख्या कंपन्या आपल्या फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यासाठी ओळखल्या जातात. आयफोन १३ सीरिजमध्ये तर केवळ २९ वॉट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. तर सॅमसंगचा सर्वात फास्ट चार्जिंग फोन हा ४५ वॉटसह येतो. अनेक कंपन्या २०० वॉट चार्जिंग सोल्यूशन्सवर काम करत आहे. काही दिवसांपूर्वी Xiaomi Mi 11 Pro साठी कंपनीने २०० वॉट चार्जिंग स्पीडचा डेमो दाखवला होता. याद्वारे फोनची ४००० एमएएचची बॅटरी फक्त ८ मिनिटांपेक्षा कमी वेळेत फुल चार्ज होऊ शकते. मात्र, कमर्शियल रिलीजसाठी अजून काही महिने लागण्याची शक्यता आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Ooc36kH