Full Width(True/False)

मोफत ई पुस्तक : ऑनलाइन वाचा आणि डाउनलोड करा मोफत पुस्तकें व पुस्तकांचे रिव्यू



मोफत ई पुस्तक : ऑनलाइन वाचा आणि डाउनलोड करा मोफत पुस्तकें व पुस्तकांचे रिव्यू




-पुस्तक म्हणजे एखाद्या पुस्तकाचे केलेले डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक रूपांतर होय. पुस्तकाची पाने पीडीएफ/किंवा चित्ररुपात ठेवता ती वेगळ्या प्रकारच्या टंकात साठविली जातात. जेणेकरून वाचक वापरत असलेल्या साधनाच्या पडद्याच्या आकाराप्रमाणे मजकूर आपोआप बदलतो आणि सुलभतेने वाचता येतो. आंतजालाला जोडलेल्या संगणकाच्या, स्मार्टफोनच्या सहाय्याने हे पुस्तक डाउनलोड करता येते आणि मग तत्सम पडद्यावर वाचता येते. कधीकधी एखाद्या संकेतस्थळाने ते उतरवून घेतलेले असते, आणि तिथूनही ते वाचता येते.

आपण खालील वेबसाईट च्या माध्यमातून मोफत साहित्य चे वाचन करू शकता ...

 साहित्य प्रतिष्ठान  

साहित्य प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षांत उभं राहिलं. काही कवी आणि लेखक यांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं. आधी मुख्यत्वे कवितासंग्रह.  पण आता कथा कादंबरीपासून ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि प्रवासवर्णनांपासून ते विनोदापर्यंत सर्व प्रकारचं साहित्य. अगदी काम्सूत्रसुद्धा. बालवाङ्मयाचा विशेष विभाग. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची इत्थंभूत माहिती देणारी सिरीज. गेल्या नऊ वर्षांत हजारभर पुस्तकांचं प्रकाशन आणि चार लाख वाचकांचं नेटवर्क उभं करण्यात त्यांना यश आलं आहे. यात साठहून अधिक देशांतले वाचक आहेत तसे महाराष्ट्रातल्या दुर्गम खेड्यापाड्यातले आणि भारतातल्या अन्य राज्यांतलेही आहेत. स्मार्ट फ़ोन्सच्या वाढत्या वापराबरोबर मोबाईलवर वाचता येतील अशा पुस्तकांची डिमांड वाढतच आहे. आणि ती पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न साहित्य प्रतिष्ठान करते. नवनवीन पुस्तके प्रकाशित करून. Android apps द्वारे सुद्धा यातील काही पुस्तके उपलब्ध आहेत. इथे वर्षाला सुमारे अर्धा कोटी पुस्तके मराठी वाचक डाऊनलोड करतात.
जगभरातील वेगवेगळ्या वयोगटांतील, वेगवेगळ्या विचारांचे, आणि वेगवेगळ्या स्तरांतील वाचक आज साहित्यशी जोडले जात आहेत. यांत ग्रामीण आहेत तसे शहरी आणि विदेशी आहेत. उच्चशिक्षित आहेत तसे अल्पशिक्षित आहेत. धनी आहेत तसे विद्यार्थीही आहेतesahity@gmail.com या मेल वर आपणही एक पत्र लिहून स्वतःला वाचक किंवा लेखक म्हणून नोंदवू शकता.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ  

मराठीभाषा, साहित्य, संस्कृती कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी, मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने १९ नोव्हेंबर, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, साहित्य आणि इतिहास तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरूवातीपासूनच मंडळ मौलिक बहुविध वाङ्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यावर मंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. या अनुषंगानेच मंडळाच्या वतीने प्रकाशित ४४४ पुस्तके -बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यानुसार ज्ञानाचा हा अनमोल ठेवा असलेली मंडळाची ४४४ पुस्तके जशी आहेत त्या स्वरुपात मंडळाच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत..

ePustakalay : Free Library | पुस्तकालय : मुफ्त पुस्तकालय

ई पुस्तकालय : ऑनलाइन वाचा आणि डाउनलोड करा मोफत पुस्तकें व पुस्तकांचे रिव्यू ह्या वेबसाईट वर तुम्हाला मोफत हिंदी , मराठी , संस्कृत इत्यादी भाषेतील पुस्तके मोफत वाचायला मिळतील. तसेच ह्या वेबसाइट वर तुम्हाला प्रत्येक धर्माची, लेखकांची तसेच सर्व विषयांवर पुस्तके वाचावयास मिळतील. तसेच या वेबसाईट आपण पुस्तकांचे रिव्यू  देखील पाहू शकता, व सर्वात महत्वाचे म्हणजे आपण ह्या वेबसाईट चा लाभ पूर्णपणे मोफत उचलू शकता.. 

तसेच खालील लिंकवर सुद्धा तुम्ही मोफत पुस्तकांचा आस्वाद घेऊ शकता . 
  




आपणास माहिती कशी वाटली, आम्हाला नक्की कळवा व अश्याच माहिती साठी आमच्या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करायचे असल्यास  www.t.me/mind4talk ह्या लिंक वर क्लिक करा.
धन्यवाद.! 
*********************************************************************************
पुस्तके ! फ़्रीपुस्तके !! इझी पुस्तके! मोफत मराठी पुस्तके ! मोफ़त मराठी बुक्स!! -साहित्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर वाचता येतील अशी पुस्तके. Free Books. Free Marathi PDF. Free Marathi eBook. Marathi Novels. Marathi Story. Marathi History. Marathi Music.