Full Width(True/False)

आता पंजाबी स्टार्सनेही दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

मुंबई- केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन वादग्रस्त शेती कायद्याचा निषेध करण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत एकत्र येत आहेत. ही चळवळ प्रथम पंजाबच्या शेतकऱ्यांनी सुरू केली होती. यानंतर हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनंतर देशातील विविध राज्यांतील शेतकरीदेखील आंदोलनाच्या समर्थनात रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. फक्त शेतकरीच नाही तर आता सेलिब्रेटीही शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. बॉलिवूडप्रमाणे पंजाबमधील अनेक सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांना थेट पाठिंबा दिला आहे. अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्यांचं सतत समर्थन केलं आहे. यावेळी त्यांनी २०१९ मध्ये मुंबईत झालेल्या शेतकरी चळवळीचा फोटो शेअर करत या चळवळीतील मागण्या पूर्ण झाल्या का असा प्रश्न विचारला. यापूर्वी त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला शेतकरी जेवण देतानाचं व्यंगचित्र त्यांनी शेअर केलं होतं. जॅजी बी प्रसिद्ध भारतीय कॅनेडियन गायक जॅजी बी यानेही शेतकऱ्यांच्या समर्थनात ट्वीट केलं आहे. जॅजी बीने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेतकरी चळवळीचे अनेक व्हिडिओही शेअर केले आहेत. प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांजनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी आवाज उठवला आहे. त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्टर शेअर केली आहे. यात त्याने लिहिले की, 'आम्ही शेतकरी आहोत, दहशतवादी नाही.' गिप्पी ग्रेवाल प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आणि गायक गिप्पी ग्रेवाल यांनीही शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवला आहे. गिप्पी ग्रेवाल यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेतकरी चळवळीचे अनेक व्हिडिओ आणि पोस्टर्सही शेअर केले आहेत. गुरप्रीत घुग्गी मशुहार पंजाबी अभिनेता आणि विनोदवीर गुरप्रीत घुग्गी यांनी सोशल मीडियावर स्वत: चा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी शेतक'्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना तरुणांना हिंसाचारापासून दूर रहाण्याचे आवाहन केले आहे. अंगद बेदी प्रसिद्ध अभिनेता आणि नेहा धुपियाचा नवरा अंगद बेदी यानेही शेतकऱ्यांचं आणि आंदोलनाचं समर्थन केलं आहे. अंगदने ट्विटर अकाउंटवर दिलजीत दोसांजचं ट्वीट रिशेअर केलं आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू हरभजन सिंग यानेही ट्वीट करून शेतकऱ्यांच्या मागण्यांचं समर्थन केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये स्पष्ट शब्दात म्हटलं की, 'शेतकरी आपला अन्नदाता आहे. आपण अन्नदात्याला थोडा वेळ दिला पाहिजे. हे वाजवी होणार नाही का? पोलिसांच्या चकमकीशिवाय आपण त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकू शकत नाही का? कृपया शेतकऱ्यांचंही ऐकून घ्या.. जय हिंद.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39wBcuZ