Full Width(True/False)

५ कॅमेऱ्याच्या रियलमी फोनचा आज सेल, बेस्ट ऑफर्स

नवी दिल्लीः रियलमीच्या जबरदस्त आणि बजेट स्मार्टफोन ला आज तुम्ही सेलमध्ये खरेदी करु शकता. या सेलची सुरुवात आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट आणि रियलीच्या वेबसाईटवर होईल. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर आणि चार रियर कॅमेऱ्याचे फीचर दिले आहेत. आजच्या सेलमध्ये नार्जो १० ला आकर्षिक ऑफर आणि बेस्ट डीलसोबत खरेदी करु शकता. वाचाः या ऑफरमध्ये खरेदी करा फोन ४ जीबी रॅम आणि १२८ जीबीचा सिंगल व्हेरियंटमध्ये येत असलेल्या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये फोनला फ्लिपकार्ट अॅक्सेस बँक क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यानंतर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक, अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यानंतर एक्स्ट्रा ५ टक्के सूट मिळणार आहे. तसेच या फोनला ३ ते १२ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर सुद्धा खरेदी करता येऊ शकते. जर या फोनला रियलमीच्या वेबसाईटवरुन खरेदी केल्यास तुम्हाला ५०० रुपये किंमतीचा १०० टक्क्यांपर्यंत सुपर कॅश मिळेल. यासाठी अट आहे की, पेमेंट तुम्हाला Mobikwik वरून करावे लागेल. वाचाः Realme Narzo 10 चे वैशिष्ट्ये ४ जीबीच्या LPDDR4X RAM सोबत येणाऱ्या या फोनमध्ये 720x1600 पिक्सल रिझॉल्यूशन आहे. ६.५ इंचाचा एचडी प्लस मिनी ड्रॉप डिस्प्ले दिला आहे. अँड्रॉयड १० वर बेस्ड Realme UIसोबत या फोनमध्ये आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. प्रोसेसर मध्ये या फोनमध्ये Mali G52 GPU के साथ मीडियाटेक हीलियो G80 एसओसी प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत एक ८ मेगापिक्सलचा आणि दोन मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये नॉच १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. डेडिकेटेड मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 4G LTE, WI-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ A-जीपीएस आणि यूएसब टाइप-सी पोर्ट यासारखे पर्याय देण्यात आले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3idRevv