नवी दिल्लीः भारतात ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यात , UC ब्राउजर, Shareit आणि Camscanner या सारख्या प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. भारत सरकारने हा निर्णय युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी घेतला आहे. सरकारकडून देशाची सुरक्षा आणि एकता कायम राहावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. भारत आणि चीन यांच्यात तणाव सुरू झाल्यानंतर चायनीज अॅप्सवर बंदी आणि चिनी मालांवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. वाचाः नियमांच्या अंतर्गत राहून घेतला निर्णय चायनीज अॅपवर ही कारवाई इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अॅक्ट, २००० च्या सेक्शन ६९ए अंतर्गत करण्यात आली आहे. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले की, आम्हाला अनेक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अॅप्सच्या माध्यमातून युजर्सची डेटा चोरी आणि भारताबाहेरील सर्वर्सवर विना परवानगी डेटा ट्रान्सफरची माहिती मिळाली होती. भारताची सुरक्षा आणि एकता राखण्यासाठी तात्काळ या अॅप्सवर कारवाई करण्याची आवश्यकता होती. वाचाः बंदी कशी लागू होणार? आता इंटरनेट सर्विस प्रोव्हाईडर्सला या अॅप्सवर बंदी घालण्याचे निर्देश दिले जातील. युजर्संना एक मेसेज मिळेल त्यात म्हटले जावू शकते, सरकारच्या आदेशावर या अॅप्सचे अॅक्सेस रोखणे गरजेचे आहे. ही पद्धत टिकटॉक, यूसी न्यूज यासारख्या अॅप्सवर प्रभाव दिसेल. कारण, या अॅप्सना इंटरनेटची आवश्यकता असते. वाचाः ऑफलाइन वापर करणाऱ्या अॅप्सला स्वतः हटवणे गरजेचे आहे. तसेच बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सला प्ले स्टोर आणि अॅप स्टोर वरून हटवले जाईल. तसेच युजर्संना अन्य अॅप्स उपलब्ध करून दिले जाऊ शकते. एका रिपोर्टमध्ये म्हटले की सरकारने गुगल आणि अॅपलला २४ तासांच्या आत हे अॅप्स हटवण्याचे निर्देश दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VuZ1LW