नवी दिल्लीः Google ने आपला सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म Google+ ला रिलाँच केले आहे. प्लसला कंपनीने गुगल करेंट्स नावाने लाँच केले आहे. Currents आता गुगल प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवर उपलब्ध आहे. गुगलचे हे अॅप आता दोन्ही अॅप स्टोर्सवर उपलब्ध आहे. परंतु, आता या अॅपचा वापर केवळ इंटरप्राईज ग्राहक करु शकतील. सर्व युजर्ससाठी हे अॅप कधी उपलब्ध होईल, याविषयी गुगलने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. वाचाः गुगल करेंट्समध्ये काय खास? प्ले स्टोरवर गुगलने या अॅपच्या डिस्क्रीप्शन मध्ये सांगितले की, या अॅपद्वारे युजर्स आपल्या साथीदारांसोबत कनेक्ट करू शकतील. डॉक्यूमेंट्स एक्सचेंज करु शकतील. तसेच ऑर्गनायझेशन सोबत अॅक्टिविटीजची संपूर्ण माहिती युजर्सला मिळणार आहे. गुगल प्लस बंद झाल्यानंतर हे अॅप युजर्ससाठी एक चांगला पर्याय मिळू शकतो. वाचाः केवळ G Suits ग्राहकांसाठी उपलब्ध प्ले स्टोरवर या अॅप्सचे डिस्क्रिप्शन वरून माहिती होते की, हे अॅप केवळ G Suits ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. 9to5Google च्या रिपोर्टनुसार, गुगल प्लसला जुन्या यूआरएलएस आताही कामी येईल. तसेच याचा वापर केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला गुगल करेंट्सवर रिडायरेक्ट करु शकतील. वाचाः २०१८ मध्ये बंद झाले होते गुगल प्लस गुगलने २०१८ मध्ये आपले गुगल प्लस प्लॅटफॉर्म बंद केले होते. गुगलने आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स गुगल प्लसच्या अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) मध्ये एक बग आला होता. रिपोर्टच्या माहितीनुसार, एक सॉफ्टवेअरमध्ये कमी आल्याने बाहेरून सॉफ्टवेअर डेव्हलपर्सला संभावित म्हणून प्रायव्हेट गुगल प्लस प्रोफाईलला अॅक्सेस मिळत होता. एक सॉफ्टवेअर गडबड असल्याने २०१५ ते २०१८ या दरम्यान डेव्हलपर्सने गुगल प्लस प्रोफाईल डेटामध्ये बग करण्याचा प्रयत्न केला आहे. गुगलच्या माहितीनुसार, जवळपास ५ लाख लोकांची खासगी माहिती लिक करण्यात आली होती. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3egwJeN