संजना पाटील लॉकडाउनच्या काळात सुरू झालेली '' ही आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. लवकरच ती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अभिनेते यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे यातले सर्व कलाकार, म्हणजेच तंत्रज्ञ, दिग्दर्शक, अभिनेते हे रत्नागिरीतल्या काही गावांतली स्थानिक मंडळी आहेत. यापैकी बहुतेकांनी पहिल्यांदाच अभिनय केला आहे. तर काही थोडक्या मंडळींनी नाटकात काम केलं होतं. लॉकडाउनच्या काळात अभिनेते वैभव मांगले जिल्ह्यातल्या देवरुख या त्यांच्या गावी अडकले होते. इतके दिवस गावी राहत असताना काही नवनवीन कल्पना त्यांच्या मनात येत होत्या. या मालिकेसाठी त्यांना कल्पना सुचली. त्यातून 'एक गाव भुताचा' ही २६ भागांची मालिका साकारली. १८ जूनपासून या मालिकेचं प्रक्षेपण सुरू झालं. भुताच्या गोष्टींवर आधारित असलेली ही मालिका आहे. परंतु, भीतीचा भाग काढून टाकून सत्य काय ते दाखवण्याचा प्रयत्न संपूर्ण टीमनं केला आहे. राजेंद्रकुमार घाग या मालिकेचे लेखक आहेत. याआधी त्यांनी '' ही मालिकादेखील लिहिली होती. 'रत्नागिरीतील नाचणे या गावी या मालिकेचे २१ भाग शूट करून पूर्ण झाले. तिथले ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच संतोष सावंत यांनी यासाठी मोलाचं सहकार्य केलं आणि शूटिंग व्यवस्थित पार पडलं. राजू घाग यांचा भाऊ प्रफुल्ल घागनं संपूर्ण व्यवस्थापन सांभाळलं', असं वैभव मांगले यांनी सांगितलं. ही मालिका आता शेवटाकडे येऊन पोहोचली आहे. चॅनलनं या मालिकेसाठी काम करण्याची सुवर्णसंधी आम्हाला आणि रत्नागिरी परिसरातील सर्व कलाकार मंडळींना उपलब्ध करून दिली हे खूप महत्त्वाचं आहे. मालिकेसाठी अनेकांनी उत्साह दाखवला आणि मेहनत करण्याची तयारी ठेवली. सर्व जण एकमेकांना मदत करत गेलो आणि याचे २१ भाग शूट देखील करून झाले. या कामासाठी अनेकांचे हात लागले आहेत. भुतांच्या गोष्टी सांगून नंतर सत्य काय ते लोकांना दाखवण्याचा हा मनोरंजनात्मक प्रयत्न आहे. - वैभव मांगले (अभिनेते)


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3e3y5t5