Full Width(True/False)

रितेश देशमुख आणि जेनेलियाने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मुंबई :मृत्यूपश्चात करणं हे अनेकांसाठी जीवनदान ठरू शकतं असं विविध माध्यमांतून सांगितलं जातं. पण, त्याबाबत अद्याप म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. अभिनेता आणि त्याची पत्नी यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत दोघांनी याबद्दलची माहिती दिली. 'डॉक्टर दिना'चं औचित्य साधत दोघांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. 'रितेश आणि मी फार आधीपासून अवयवदानाविषयी विचार करत होतो. 'डॉक्टर दिना'चं औचित्य साधत आम्ही मृत्यूपश्चात अवयवदान करण्याचा निर्णय घेत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल आम्ही डॉ. नोझर शेरिअरचे आभार मानतो. एखाद्याला सर्वोत्तम भेट द्यायची असेल तर जीवनदान हीच भेट सर्वोत्तम असू शकतो. या उपक्रमात सहभागी व्हा आणि तुम्हीसुद्धा अवयवदान करा', असं आवाहनही या दोघांनी केलं आहे. अवयवदानामुळे एखाद्याला नवीन आयुष्य मिळू शकतं, त्याचं थांबलेलं जगणं सुरू होऊ शकतं. त्यामुळे अनेक कलाकार अवयवदानाचं महत्त्व पटवून देताना दिसत आहेत. रितेश- जेनेलियाच्या आधी अनेक सेलिब्रिटींनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3glkyhT