करोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रीकरणाच्या सेट्सवर स्वच्छतेची पुरेपूर खबरदारी घेतली जातेय. या मराठी तरुणानं त्यातून सेटवर करून देण्याचा नवा रोजगार सुरू केला असून, त्यातून सुमारे ७० तरुणांच्या हाताला त्यानं काम दिलं आहे. संजना पाटील, कॉलेज क्लब रिपोर्टर सुमारे साडेतीन महिन्यांनंतर चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. कलाकार, शूटिंगच्या टीम्स नव्या जोमानं, उत्साहानं काम करताना दिसताहेत. सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून सेटवर सातत्यानं निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) केलं जातंय. विक्रांत शिंदे या तरुणानं त्याच्या संपूर्ण टीमसह सेटवर सॅनिटायझेशन करून देण्यास सुरुवात केली. विक्रांत एका वाहिनीवरील सर्व मालिकांच्या सेटवर निर्जंतुकीकरण करून देण्याचं काम करतो. या कामातून त्यानं सुमारे ७० तरुणांना काम दिलं आहे. चित्रीकरण सुरू होण्याआधी संपूर्ण सेट, मेकअप रूम्स, शौचालयं सर्वत्र निर्जंतुकीकरण केलं जातं ज्याला फ्युमिगेशन असं म्हटलं जातं. कलाकार सेटवर आले की त्याच्या गाड्यांचंसुद्धा निर्जंतुकीकरण केलं जातं. दर दोन तासांनी शौचालयंदेखील स्वच्छ केली जातात. त्या वाहिनीवरील मालिकांच्या कामाबरोबरच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', ' ह.म. बने तु.म. बने' या मालिकांसाठीदेखील तो काम करतो. या कामानंतर दशमी क्रिएशन्सच्या तीन मालिकांचं काम विक्रांतकडे आलं. त्याच्याकडे येणाऱ्या कामात आता वाढ होत चालली आहे. विक्रांतचे काका सुहास माटे, हर्षित तासकर आणि भाऊ साई घोगले या सर्वांनी एकत्र येऊन हे काम केलं आहे. निनाद वैद्य यांचीसुद्धा या कामात त्याला महत्त्वपूर्ण साथ मिळते आहे. मुंबईमधील कोव्हिड केंद्र, कस्तुरबा हॉस्पिटल, नेस्को अशा ठिकाणीसुद्धा ते फ्यूमिगेशनचं काम करत आहेत. विक्रांत एमडी कॉलेजचा माजी विद्यार्थी असून तेव्हापासून तो थिएटरशी जोडला गेलेला आहे. अनेक नाटक, एकांकिकांमधून त्यानं काम केलं आहे. अनेक मालिकांचं प्रोडक्शनसुद्धा सांभाळलं आहे. माझ्या या कामाचा मूळ हेतू मुलांना रोजगार मिळवून देणं हा आहे. इंडस्ट्रीसाठी काम करावं असं मला वाटलं. कारण इथूनच माझी सुरुवात झाली. या रंगभूमीनं मला खूप काही दिलं. माझ्यावर इतकी मोठी जबाबदारी दिल्याबद्दल मी चॅनलचे आभार मानतो. हे काम सोपं नव्हतं, परंतु योग्य निर्णय घेत इथपर्यंत आलो. - विक्रांत शिंदे (समन्वयक)


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ee1e51