मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या धक्कादायक आत्महत्येनंतर बॉलिवूडमधली घराणेशाही, नवोदित कलाकारांना नाकारली जाणारी संधी यावरुन वाद उफाळून आला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग सुरू झालं. चाहत्यांमध्ये उफाळलेल्या संतापावरून अभिनेता यानं बॉलिवूड कलाकारांना सुनावलं आहे. 'होय, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण बांधिल आहोत', असं तो म्हणतोय. हे म्हणत असताना त्यामागील कारणसुद्धा त्यानं सांगितलं आहे.मनोज वाजपेयीनं सुशांतबरोबर 'सोनचिडियाँ' या चित्रपटात काम केलं होतं. माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत मनोज म्हणाला, की 'सेलिब्रिटी जर लोकांनी केलेलं कौतुक ऐकत असतील, तर त्यांची टीकासुद्धा ऐकली पाहिजे. जर तुमच्याविरोधात असंतोष असेल, तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे. ही लोकं जर माझा चित्रपट हिट करत असतील आणि मी त्यांना योग्य म्हणत असेन, तर जेव्हा हेच लोक मला प्रश्न विचारतील, तेव्हा त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठीही मी बांधील आहे. सरकारसुद्धा याच नियमावर चालतं.' मनोज वाजपेयीच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा दोन गट पडल्याचं दिसून येतंय. त्याबरोबरच अनेक बड्या कलाकारांनी या ट्रोलिंगच्या त्रासामुळे सोशल मीडियाला राम राम ठोकला आहे. दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणाची चौकशी करणाऱ्या वांद्रे पोलिसांनी बॉलिवूड जगतातील मंडळींचे जबाब नोंदविण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची पोलिसांनी सोमवारी तीन तास चौकशी केली. या चौकशीचा तपशील सविस्तर मिळू शकला नसला, तरी भन्साळी यांनी सुशांतसिंह सोबत केलेल्या कराराबाबत पोलिसांनी प्रश्न विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुशांत याने १४ जून रोजी वांद्रे येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी लिखित स्वरूपात काहीच न सापडल्याने त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. मात्र बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने जीवन संपवल्याचे म्हटले जात आहे. बॉलिवूडमध्ये ठरवून काम दिले जात नसल्याच्या कारणामुळे तो तणावाखाली होता. नेमक्या कोणत्या कारणामुळे सुशांत तणावाखाली होता, हे शोधण्यासाठी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. सुशांतला ओळखणाऱ्या, त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचे जबाब घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासह सुशांतचे नातेवाईक तसेच इतर अशा एकूण २८ जणांचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी संजय लीला भन्साळी यांना समन्स बजावले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gKrF3V