मुंबई- ज्येष्ठ अभिनेते यांचे वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून त्यांना अनेक व्याधींनी ग्रासले होते. त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या त्यांचा दफनविधी होणार आहे. जगदीप यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टी एका निखळ मनोरंजन देणाऱ्या दमदार अभिनेत्याला मुकली आहे. जगदीप यांचं हिंदी सिनेसृष्टीला दिलेलं योगदान कधीही विसरता येण्यासारखं नाही. व्हिलचेअरवर बसून घेतला पुरस्कार २०१९ मध्ये जगदीप यांना आयफा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. जगदीप यांना आउटस्टॅण्डिंग कन्ट्रीब्यूशन टू इंडियन सिनेमा हा पुरस्कार देण्यात आला होता. रमेश सिप्पी आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी हा पुरस्कार जगदीप यांना दिला होता. यावेळी स्टेजवर त्यांच्यासोबत , नावेद जाफरी आणि नातू मीजान जाफरी उपस्थित होते. जगदीप यांना त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी विशेष ओळखलं जातं. करिअरमध्ये ४०० हून अधिक सिनेमे करणाऱ्या जगदीप यांनी लहान वयातच हिंदी सिनेसृष्टीत काम करायला सुरुवात केली होती. सिनेमातील त्यांची सुरमा भोपाली ही व्यक्तीरेखा आजही लोकांच्या लक्षात आहे. जगदीप यांचं मूळ नाव असं होतं. जगदीप यांच्या पश्चात मुलगा जावेद जाफरी, निर्माता व दिग्दर्शक नावेद, मुलगी मुस्कान जाफरी व दुसरी पत्नी नाझिमा असा परिवार आहे. जगदीप यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात २९ मार्च १९३९ रोजी दतिया सेंट्रल प्रांतात झाला. चंदेरी दुनियेत त्यांनी बालकलाकार म्हणून पहिले पाऊल ठेवले. बी. आर. चोप्रा यांच्या अफ्साना चित्रपटात त्यांनी काम केले होते. त्यानंतर ब्रह्मचारी चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकारली आणि आपल्या अभिनयाची छाप सोडली. पुराना मंदिर, थ्री डी सामरी या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. जगदीप यांच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना निखळ मनोरंजन दिले. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या शोले चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. या चित्रपटात जगदीप यांनी हे पात्र साकारले होते. या भूमिकेने जगदीप यांना नव्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यानंतर १९९४ मध्ये अंदाज अपना अपना या गाजलेल्या चित्रपटातही जगदीप यांनी भूमिका साकारली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31VvLC1