नवी दिल्लीः देसी अॅप मित्रों () ची प्रसिद्धी खूपच वेगाने वाढत आहे. भारत सरकारकडून टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर या अॅपच्या डाउनलोडमध्ये वेगाने वाढ होत आहे. प्ले स्टोरवर या अॅपला २५ मिलियन म्हणजेच २.५ कोटी हून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. मित्रों अॅपला काही कारणावरून प्ले स्टोरवरून हटवले सुद्धा होते. त्यानंतर डेव्हलपर्सने तांत्रिक कारण शोधून ते बरे केले. त्यानंतर हे अॅप पुन्हा प्ले स्टोरवर उपलब्ध करण्यात आले. वाचाः रोज क्रिएट होताहेत १० लाख व्हिडिओ अॅप डेव्हलपर्सच्या माहितीनुसार, मित्रों अॅपवर प्रत्येक तासाला ४ कोटींहून अधिक वेळा व्हिडिओ पाहिले जात आहेत. तर रोज १० लाख व्हिडिओ क्रिएट केले जात आहेत. या अॅपला एप्रिलमध्ये लाँच करण्यात आले होते. वाचाः वादग्रस्त राहिले आहे मित्रों अॅप मित्रों अॅप वरून अनेक वेळा वाद झाला आहे. या अॅपला आधी पाकिस्तानी डेव्हलपर्सकडून खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. अॅपचे को-फाउंडर शिवांक अग्रवाल आणि अनीष खंडेलवाल यांनी या अॅपच्या सोर्स कोड वरून करण्यात आलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले होते. सीईओ शिवांक अग्रवाल यांनी प्रेस नोट जारी करून एक कोटी डाउनलोड झाल्याची माहिती दिली होती. वाचाः चिंगारी अॅप सुद्धा होतोय प्रसिद्ध टिकटॉकवर बंदी घालण्यात आल्यानंतर देसी अॅप्सना मोठा फायदा झाला आहे. चिंगारी अॅपला सुद्धा याचा फायदा मिळाला आहे. चिंगारी अॅपवरून व्हिडिओ अपलोड आणि डाऊनलोड केले जावू शकते. तसेच या अॅपमध्ये फ्रेंड्ससोबत चॅटिंग, नवीन लोकांसोबत चर्चा, फीडवरून ब्राऊझिंग तसेच व्हॉट्सअॅप स्टेटस, व्हिडियो, ऑडियो क्लिप्स, GIF स्टिकर्स आणि फोटोज क्रिएट केले जावू शकतात. चिंगारी अॅपला मिळत असलेला जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याने अनेक जण गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. चांगल्या गुंतवणूकीनंतर या अॅपला आणखी फ्री ऑफ कॉस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनवले जावू शकते, असे डेव्हलपर्सने म्हटले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZbyyoL