मुंबई- महेंद्रसिंग धोनीने काल ७ जून रोजी स्वतःचा वाढदिवस साजरा केला. त्याच्याबद्दल या दिवसांमध्ये अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकीकडे द कपिल शर्मा शोमध्ये जाण्यासाठी अनेक सेलिब्रिटी उत्सुक असतात. पाकिस्‍तानी क्रिकेटर से वसीम अकरम और शोएब अख्‍तर पण या शोमध्ये येण्याचं अनेकदा आमंत्रण देऊनही धोनी कधीच या शोमध्ये आला नाही. २०१६ मध्ये 'एमएस धोनी: द अनटोल्‍ड' सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सुशांतसिंह राजपूतसोबत धोनी द कपिल शर्मा शोमध्ये येईल असं टीमला वाटत होतं. पण तेव्हाही धोनीने कार्यक्रमाला यायला स्पष्ट नकार दिला. धोनीने शोमध्ये न येण्याचं कारण कधीही त्याला स्वतःला यायचं नाही असं दिलं नाही. तर व्यग्र वेळापत्रकामुळे त्याला शक्य नसल्याचं धोनीने नेहमी सांगितलं. धोनीप्रमाणे सचिनही कधी गेला नाही धोनीशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही या शोमध्ये कधी गेला नाही. या शोमध्ये स्वतः नवज्योतसिंह सिद्धू यांनी सचिनला अनेकदा बोलावलं. पण सचिननेही व्यग्र वेळापत्रकाचं कारण देत या शोमध्ये येणं अजूनपर्यंत टाळलं. फक्त क्रिकेटरच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या शोमध्ये यायला नकार दिला आहे. आमिर खाननेही दिला नकार धोनी आणि सचिनप्रमाणे आमिर खानही या शोमध्ये आतापर्यंत कधीच दिसला नाही. 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' सिनेमाच्या प्रमोशनवेळी तो या शोमध्ये येईल असं वाटलं होतं. पण असं काही झालं नाही. याउलट शाहरुख खान आणि या शोमध्ये आतापर्यंत अनेकदा आले आहेत. स्वतः सलमान या शोचा निर्माता आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात नेमके काय करायचे, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असेल. पण या वेळेचा सदुपयोग करतोय तो भारताचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी. कारण लॉकडाऊनच्या काळात धोनी शेतात घाम गाळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. महेंद्रसिंह धोनी करतोय सेंद्रीय शेती धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचे काय होणार, हा सर्वात मोठा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. जर आयपीएल झाली नाही तर धोनीची कारकिर्द धोक्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण धोनीने मात्र या गोष्टीचे जास्त दडपण घेतलेले नाही. त्यामुळेच धोनी सध्याच्या घडीला शेतकरी बनल्याचे पाहायला मिळते आहे. धोनीकडे जवळपास ४० एकर एवढी शेती असल्याचे समजते. धोनी या शेतांमध्ये फळझाडांची जास्त लागवड करतो. ही शेती सेंद्रीयपद्धतीने केली जाते. धोनी जास्तकरून पपई किंवा केळ्यांची झाडं लावतो. काही दिवसांत धोनी आपला शेतीविषयक एक ब्रँड आणणार आहे. या सर्व गोष्टींची तयारी सध्याचा घडीला सुरु झाली आहे. येत्या ३-४ महिन्यांमध्ये धोनीचा हा नवीन ब्रँड बाजारात येणार असल्याचे म्हटले जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2CfvnUc