मुंबई: बॉलिवूडमधील अनेक गोष्टी आणि घटनांबाबत अभिनेत्री हिनं वेळोवेळी स्पष्ट मतं मांडली आहेत. आता ती कास्टिंग काऊचच्या अस्तित्वाबद्दल व्यक्त झाली आहे. आणि धमकावणं हे आजही कमी झालेलं नाही. अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून प्रयत्न झाले आहेत, असं तिनं स्पष्टपणे सांगितलं आहे. अलीकडे झालेल्या एका मुलाखतीत अदितीनं कास्टिंग काऊच आणि फिल्म इंडस्ट्रीमधील लैंगिक शोषणाबद्दल मतं मांडली आहेत. अदिती सांगते की, 'ऐका, हे फक्त माझ्या बाबतीत नाही. असंख्य लोक या विचित्र स्थितीतून गेले आहेत. आमच्यातील काही जण यातून सुखरुप बाहेर पडले तर काहींना त्रास झाला. या सगळ्यातून मी वेळीच बाहेर पडले. इंडस्ट्री सोडल्यानंतरही लोक धमकावतात.' अशा गोष्टींना तिनं कधीच महत्त्व दिलं नाही. त्यामुळे तिला आठ महिने काम मिळालं नव्हतं, हे तिने पूर्वी सांगितले आहे. आता बऱ्याच कालावधीनंतर ती परिणीती चोप्रा आणि कीर्ती कुल्हारीसोबत 'द गर्ल ऑन द ट्रेन' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रिभू दासगुप्ता यांनी केलं आहे. #MeToo: तनुश्रीला दिला होता पाठिंबाअभिनेता नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर अदिती राव हैदरी हिनं तनुश्रीला पाठिंबा दर्शवला होता.'गैरवर्तन आणि लैंगिक शोषणाबद्दल बोलण्याची वेळ आता आली आहे. खरंतर अशा गोष्टींबद्दल बोलण्यासाठी धाडस लागतं. कारण हे सगळं बोलणं अवघड असतं. तनुश्रीला मन मोकळं करायला दहा वर्षं लागली. एखाद्याचं नाव घेऊन आरोप केल्यावर काय होऊ शकतं, याबद्दल आपल्या मनात भीती असते. समोरची व्यक्ती त्रास देऊ शकते. घाबरवू शकते. आपलं तोंड बंद करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले जाऊ शकतात, हे आपल्याला माहीत असतं. तरीही तनुश्रीनं धाडस केलं,' असं अदितीनं म्हटलं होतं. 'या प्रकरणात कोणी समोर येऊन बोलत असेल तर, त्याचं ऐकून घ्या. संवेदनशीलता दाखवा. आता हे सर्व काही बदलण्याची वेळ आली आहे. आपल्या समाजात हे सर्व घडत आहे. हे आपण स्वीकारायला हवं आणि हे थांबवण्यासाठी काही तरी करायला हवं. कारण कोणीही पदाचा गैरवापर करता कामा नये,' असंही तिनं म्हटलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3f8Y3gc