मुंबई- कुख्यात गुंड आज एनकाउन्टरमध्ये मारला गेल्यानंतर बॉलिवूड दिग्दर्शक ट्रेण्डमध्ये आला आहे. रोहितच्या अनेक सिनेमांमध्ये पोलीस आणि गुंडांमधली चकमक दाखवण्यात आली आहेत. अनेक सिनेमात एनकाउन्टरही दाखवण्यात आले आहे. याचमुळे विकासचं एनकाउन्टर हे रोहित शेट्टीच्या सिनेमातील अॅक्शन सीनसारखं असल्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहे. ट्विटरवर अनेक युझर्सने रोहितचे सिनेमे आणि विकास दुबेचं एनकाउन्टर यांचा संबंध दाखवला आहे. एका युझरने लिहिले की, 'आता रोहित शेट्टी बोलत असेल ही तर माझ्याच सिनेमाची कथा आहे...' दुसऱ्या युझरने एएनआयने शेअर केलेल्या ट्वीटला रिप्लाय देत म्हटलं, 'ज्या पद्धतीने गाडी उलटी झाली, मला वाटतं की रोहित शेट्टीला या स्क्रिप्टसाठी बोलावण्यात आलं होतं.' अजून एका युझरने रोहितसोबत अनुराग कश्यपचं नाव टॅग करत लिहिले की, 'विकास दुबेवर सिनेमा तयार केला तर रोहित शेट्टी त्याला खलनायक करेल आणि त्याला स्वतःच्या सिनेमात हिरो करेल.' तसेच अजून एका युझरने लिहिले की, 'मला वाटतं आज रोहित शेट्टी सर्वात आनंदी माणूस असेल. तो सूर्यवंशीचा पुढील भागही तयार करू शकतो. मस्त फिल्मी एनकाउन्टर होतं... शाब्बास पोलीस...' दरम्यान, उत्तर प्रदेशातील ८ पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे अखेर आज मारला गेला. उत्तर प्रदेश एसटीएफची टीम त्याला उज्जैनहून कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांची गाडी उलटली. त्या संधीचा फायदा घेऊन दुबेने पळण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस चकमकीत तो मारला गेला. आठ दिवसानंतर पोलिसांच्या तावडीत सापडलेला दुबे अवघ्या २४ तासांतच ठार झाला. हिस्ट्रीशीटर विकास दुबे याला मध्य प्रदेशच्या उज्जैनहून कानपूरला आणण्यात येत होतं. यावेळी एसटीएफच्या गाड्यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. याच गाडीत विकास दुबे बसला होता. अपघातानंतर विकास दुबेनं एसटीएफच्या एका अधिकाऱ्याच्या हातातला पिस्तुल हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेला.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38IGtNo