मुंबई- दिग्गज अभिनेते यांचे त्यांच्या राहत्या घरी ८ जुला रोजी निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. जगदीप यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना केला. पण या सगळ्यात त्यांनी कधी हार मानली नाही, उलट हिंमतीने सर्व संकटांचा सामना करत आयुष्य जगत राहिले. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आईने सांगितलेल्या एका शेरचा उल्लेख केला. या शेरने त्यांना कायमच प्रेरणा दिली असंही जगदीप म्हणाले होते. आईच्या एका शेरने संपूर्ण आयुष्य बदललं- जगदीप म्हणाले होते की, 'आयुष्याकडून मी खूप काही शिकलो. माझ्या आईने मला शिकवलं होतं. एकदा मुंबईत वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस पडत होता. आम्हाला अंधेरीला जायचं होतं. अशा पावसातही आम्ही चालत होतो. तेवढ्यात आईच्या पायाला एक पत्रा लागला. तिच्या पायातून रक्त वाहू लागलं होतं.' 'आईच्या पायातून वाहणारं रक्त पाहून मी रडू लागलो. तेव्हा आईने लगेच तिची साडी फाडली एक कपडा जखमेवर लावला. आईला मी पाऊस जाईपर्यंत थांबायला सांगितलं. तेव्हा आईने एक शेर सांगितला.' आई म्हणाली की, ''वो मंजिल क्या जो आसानी से तय हो वो राह ही क्या जो थककर बैठ जाए.' आयुष्यभर मला हा शेर लक्षात राहिला आणि त्यानुसार माझं आयुष्य मी जगत गेलो. आपल्या प्रत्येक पाऊलाला एक इच्छित स्थळ समजलं पाहिजे. उडी मारायची नाही. उडी मारली तर पडणं निश्चित आहे.' ' ' चित्रपटात ' 'ची भूमिका जगदीप यांनी साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना फार मोठं ग्लॅमर मिळालं होतं. जगदीप यांचं मूळ नाव असं होतं. जगदीप यांच्या पश्चात मुलगा , निर्माता व दिग्दर्शक नावेद, मुलगी मुस्कान जाफरी व दुसरी पत्नी नाझिमा असा परिवार आहे. जगदीप यांनी प्रदीर्घ काळ सिनेसृष्टीची सेवा केली. तब्बल ४०० हून चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. जगदीप यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात २९ मार्च १९३९ रोजी दतिया सेंट्रल प्रांतात झाला. चंदेरी दुनियेत त्यांनी बालकलाकार म्हणून पहिले पाऊल ठेवले. बी. आर. चोप्रा यांच्या अफ्साना चित्रपटात त्यांनी काम केले होते. त्यानंतर ब्रह्मचारी चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकारली आणि आपल्या अभिनयाची छाप सोडली. पुराना मंदिर, थ्री डी सामरी या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. जगदीप यांच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना निखळ मनोरंजन दिले. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. या चित्रपटात जगदीप यांनी सूरमा भोपाली हे पात्र साकारले होते. या भूमिकेने जगदीप यांना नव्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यानंतर १९९४ मध्ये अंदाज अपना अपना या गाजलेल्या चित्रपटातही जगदीप यांनी भूमिका साकारली होती.नी भूमिका साकारली. त्यांच्या निधनाने एका दिग्गज विनोदी कलावंताला बॉलीवूड मुकल्याची भावना विविध कलावंतांनी व्यक्त केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38DXecN