नवी दिल्लीः चीनच्या स्मार्टफोन कंपनीची सी सीरिजच्या फोनची वेगाने प्रसिद्धी होत आहे. इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी ट्विटरवर एक घोषणा केली आहे. कंपनीच्या बजेटमधील सीरीजच्या युजर्सची संख्या ही भारतात ७५ लाखांहून अधिक झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. २०१८ मध्ये लाँच झालेल्या या सीरीजच्या फोन युजर्संची संख्या वेगाने वाढत आहे. आता कंपनी १४ जुलै रोजी सुद्धा लाँच करणार आहे. वाचाः माधव सेठ यांनी आपल्या ट्विटमध्ये नवीन डिव्हाईसच्या लाँचची माहिती देताना सांगितले की, कंपनी या सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन समावेश करणार आहे. नवीन मॉडलचे नाव Realme exec असल्याचे समोर आले होते. परंतु, आता या नावाऐवजी Realme C11 या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. या स्मार्टफोनला मलेशियात आधीच लाँच करण्यात आलेले आहे. Realme C सीरीज मध्ये Realme C1, C2 आणि C3 या फोनचा समावेश आहे. वाचाः किती असेल किंमत ? आपल्या ट्विटमध्ये रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी सांगितले की, भारतात ७५ लाख हून अधिक युजर्स कंपनीच्या बजेटमधील फोनचा वापर करीत आहेत. तसेच या तिन्ही डिव्हाईसेजला फ्लिपकार्टवर चांगली रेटिंग्स मिळाली आहे. रियलमी मोबाइल्स ट्विटर पेजवर दोन टीझर पोस्ट करण्यात आले होते. ज्यात एंट्री लेवल सी सीरिज मॉडलकडे इशारा करण्यात आला होता. मलेशियात लाँच करण्यात आलेल्या सी११ या फोनची किंमत १०० डॉलर म्हणजेच ७ हजार ५०० रुपये ठेवण्यात आली आहे. वाचाः समोर आले फीचर्स भारतात १४ जुलै रोजी लाँच करण्यात येणाऱ्या Realme C11 मध्ये ६.५ इंचाचा (720x1600) चे IPS LCD पॅनेल वॉटरड्रॉप नॉच डिझाईन देण्याची शक्यता आहे. डिस्प्लेत ८८.७ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो मिळणार आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम सोबत MediaTek Helio G35 प्रोसेसर आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकतो. तसेच हा फोन अँड्रॉयड १० सोबत येईल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZQY8hV