मुंबई: एका महिन्यापूर्वी बॉलिवूडला एक धक्का बसला. तो धक्का होता अभिनेता याच्या आत्महत्येचा. सुशांतनं आत्महत्या केली एक स्विकारायला त्याचे चाहते अद्यापही तयार नाहीत. या एका महिन्यात अनेक चर्चांना उधाण आलं. सुशांतच्या खासगी आयुष्याचीही चर्चा झाली. या चर्चेचा एक महत्त्वाचा भाग होती ती म्हणजे अभिनेत्री . एक महिना मौन पाळल्यानंतर रियानं सुशांतसाठी आज एक भावुक अशी पोस्ट शेअर केलीए. या पोस्टवरून त्या दोघांमध्ये असलेल्या नात्याचाही खुलासा झालाय. 'न भरून निघणारी पोकळी निर्माण झालीए.. तू मला प्रेमावर विश्वास ठेवायला शिकवलं, त्याची ताकद काय असते ते सांगितलं. साधं गिणताचं कोडं आयुष्याचा अर्थ कसं उलगडू शकेल हे शिकवलं. प्रत्येक दिवशी मी तुझ्याकडून काहीतरी शिकलेय.मला माहित्येय आता तू एका चांगल्या ठिकणी आहेस. चंद्र, ताऱ्यांनी तुझं स्वागत केलं असणार. आता तू सहानुभूती आणि आनंदान भरलेला एक तारा आहेस. या ताऱ्याची मी नक्कीच वाट पाहणार आहे. तू परत ये..एक चांगला व्यक्ती म्हणून तू सर्वकाही होतास..जगानं पाहिलेलं आश्चर्य होतास. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी माझे शब्द अपूरे आहेत. ३० दिवस तुझ्याशिवाय...पण आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करत राहणार आहे...' असं म्हणत रियानं तिच्या भावनांवा वाट मोकळी करून दिली आहे. तसंच सुशांतची रियानं तिचा व्हॉट्सअप प्रोफाइल फोटो बदलून सुशांतसोबतचा फोटो लावला आहे. या जुन्या फोटोमध्ये दोघं फार आनंदी दिसत आहेत. सुशांतच्या निधनानंतर रिया सोशल मीडियापासून दूर होती. १४ जूनला तिनं शेवटची पोस्ट केली होती. रिया आणि सुशांतनं कधीही त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला नाही. पण दोघांचे फोटो आणि एकत्र पार्टी करणं पाहून दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. यासंबंधी रियासह ३५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून सुशांतचे चाहते तपासणीसाठी सातत्याने सीबीआयची मागणी करत आहेत. दोन मानसिक आजारांशी लढत होता सुशांत दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येचं मुख्य कारण हे त्याचं डिप्रेशन असल्याचं सांगितलं जात असून याच्याच उपचारासाठी तो हिंदुजा रुग्णालयात अॅडमिट झाला होता. सुशांतनं आत्महत्याच केली असून हत्येचा कटाचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचंही एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. सुशांतनं आत्महत्या का केली याचंही उत्तर आम्हाला जवळजवळ मिळालं आहे, असंही ते म्हणाले.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3j1qz5B