मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला आज महिना झाला. गेल्या महिन्याभरापासून या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. आत्महत्येप्रकरणी आवश्यक त्या सर्व व्यक्तींचे जबाबही नोंदवण्यात आले आहे. ३५ हून अधिकांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट या सर्वांच्या सहाय्याने सुशांतच्या आत्महत्येची चौकशी जवळजवळ पूर्ण झाली आहे. तसेच पोलिसांची टीम याचा रिपोर्ट ते पुढील १० ते १२ दिवसांमध्ये सादर करतील. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी फॉरेन्सिक टीमच्या पाच अधिकाऱ्यांनी या केसवर चर्चा केली. या चर्चेत या केसचा अंतिम रिपोर्ट सादर करण्यावर सर्वांचं एकमत झालं. तसेच जर या प्रकरणी अजून कोणाची चौकशी करायची असल्यास त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात येईल. पण आतापर्यंत आलेल्या रिपोर्टच्या जोरावर डॉक्टरांना या केसमध्ये कोणतीही अनैसर्गिक गोष्ट जाणवली नाही. गेल्या महिन्यात १४ तारखेला सुशांतसिंह राजपूतने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. वयाच्या ३४ व्या वर्षी नैराश्यात त्याने आपलं आयुष्य संपवलं. त्या दिवसापासून आजपर्यंत पोलिसांनी जवळपास ३५ हून अधिक लोकांचा जबाब नोंदवला. सुशांतच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्येही त्याचा मृत्यू गळफास लावून झाल्याचं स्पष्ट झालं. याशिवाय त्याच्या रक्तात कोणताही विषारी किंवा अमली पदार्थ मिळाला नाही. राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी, अभिनेता शेखर सुमन आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांनी सुशांतच्या आत्महत्येची सखोल चौकशी व्हावी असंही म्हटलं होतं. दोन मानसिक आजारांशी लढत होता सुशांत- दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येचं मुख्य कारण हे त्याचं डिप्रेशन असल्याचं सांगितलं जात असून याच्याच उपचारासाठी ते हिंदुजा रुग्णालयात अॅडमिट झाला होता. सुशांतनं आत्महत्याच केली असून हत्येचा कटाचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. सुशांतनं आत्महत्या का केली याचंही उत्तर आम्हाला जवळजवळ मिळालं आहे, असंही ते म्हणाले. डिप्रेशनच्या दोन भयावह आजारांनी सुशांतला ग्रासलं होतं. या दोन मानसिक आजारांनीच त्याचा जीव घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं. पॅरानोया आणि बायपोलक डिसऑर्डर या दोन आजारांनी सुशांत ग्रासला होता. या आजारांवर हिंदुजा रुग्लालयात त्यानं आठवडाभर उपचार घेतले होते. 'पॅरानोया' हा एक संशयाचा आजार आहे. यात आपल्या जवळच्या व्यक्ती आपला द्वेश करतायत असं वाटू लागतं. एकांतात असताना कोण तरी आपल्याला संपवण्यासाठी प्रयत्न करतंय, असा विचार सतत डोक्यात येत असतो. तसंच बायपोलक आजारात व्यक्तीच्या स्वभावात सतत चढउतार पाहायला मिळतात. कधी तो एकदम तणावात असतो तर कधीतरी व्यक्तीचा आत्मविश्वास अचानक वाढतो. त्यामुळं हे दोन आजार त्याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचं म्हटलं जात आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gXYpGK