नवी दिल्लीः शाओमीच्या (Xiaomi ) स्मार्टफोन चा आज पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन याच आठवड्यात लाँच करण्यात आला होता. आज दुपारी १२ वाजता या सेलला सुरूवात होणार आहे. ग्राहक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉन आणि Mi.com वरून हा फोन खरेदी करू शकतात. तसेच हा फोन Mi स्टोर्सवर सुद्धा उपलब्ध आहे. या फोनमध्ये 5,020mAh बॅटरी, 128 जीबी पर्यंत स्टोरेज आ 48 मेगापिक्सल प्राइमरी सेंसरचे चार रियर कॅमेऱ्याचा सेटअप यासारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः रेडमी नोट ९ ची किंमत या फोनची सुरुवातीची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग फीचर रेडमी नोट ९ स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस ( 2340x1080 पिक्सल रेजॉलूशन) डिस्प्ले दिला आहे. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ५ आणि स्प्लॅश फ्री नॅनो कोटिंग देण्यात आली आहे. हा फोन 4 जीबी/6 जीबी रॅम, 64 जीबी/128 जीबी स्टोरेज आणि मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर सोबत येतो. फोनमध्ये 5,020mAh ची बॅटरी मिळेल. फास्ट चार्जिंगसाठी 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच रिव्हर्स चार्जिंग फीचर सोबत येतो. वाचाः 48MP चा क्वॉड रियर कॅमेरा फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा इन डिस्प्ले कॅमेरा दिला आहे. फ्रंट कॅमेऱ्यात फ्रंट फेसिंग फ्लॅश, HDR मोड, फेस रिकॉग्निशन आणि AI मोड्स यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनच्या रियर पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2CYQ8Uz