मुंबई- बॉलिवूड अभिनेता सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यापासून ते सद्य परिस्थितीवरही परखडपण तो भाष्य करतो. नुकताच रितेशने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये एक महिला दिव्यांग व्यक्तीची मदत करताना दिसत आहे. त्यांच्यासाठी बसच्या मागे धावत तिने बस थांबवली. बस थांबवल्यानंतर तिने दिव्यांग व्यक्तीला बसपर्यंत जाण्यासाठी मदत केली. रितेशने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केल्यानंतर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर खूप साऱ्या कमेन्टही केल्या आहेत. रितेश देशमुखने महिलेचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, 'जेव्हा कोणी पाहणारं नसेल तेव्हा आपल्याला यांच्यासारखं होण्याचं ध्येय ठेवलं पाहिजे.' व्हिडिओत एक महिला दिव्यांग व्यक्तीच्या मदतीसाठी बसच्या मागे धावत जाते. बस थांबवल्यानंतर ती पुन्हा धावत दिव्यांग व्यक्तीकडे जाते आणि त्याला बसपर्यंत जाण्यासाठी मदत करते. दिव्यांग व्यक्तीला सुरक्षित बसमध्ये चढवून दिल्यानंतर ती आपल्या मार्गाने निघून जाते. रितेशने त्या महिलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून सलाम केला. रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये त्याच्या सिनेमांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा-देशमुख यांनी करण्याचा निर्णय घेतला. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत दोघांनी याबद्दलची माहिती दिली. 'डॉक्टर दिना'चं औचित्य साधत दोघांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. 'रितेश आणि मी फार आधीपासून अवयवदानाविषयी विचार करत होतो. 'डॉक्टर दिना'चं औचित्य साधत आम्ही मृत्यूपश्चात अवयवदान करण्याचा निर्णय घेत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल आम्ही डॉ. नोझर शेरिअरचे आभार मानतो. एखाद्याला सर्वोत्तम भेट द्यायची असेल तर जीवनदान हीच भेट सर्वोत्तम असू शकतो. या उपक्रमात सहभागी व्हा आणि तुम्हीसुद्धा अवयवदान करा', असं आवाहनही या दोघांनी केलं आहे. रितेशच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर बागी ३ सिनेमात तो शेवटचा दिसला होता. यासिनेमात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ आणि अंकिता लोखंडेच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gEM622