'क्राइम थ्रिलर किंवा सायकोलॉजिकल थ्रिलर आहे म्हणून नव्हे, तर मनाला भिडणारा आशय प्रेक्षक उचलून धरतात. लोकांना जे आवडतंय तेच वेब सीरिजमध्ये अधिक दाखवलं जातंय'...हे म्हणणं आहे अभिनेता याचं. '' या दुसऱ्या सीझनच्या निमित्तानं त्याच्याशी झालेल्या गप्पा. 'ब्रिथ' सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये अभिनेता अमित साधच्या अभिनयाची जबरदस्त चर्चा झाली. आता 'ब्रिथ इन टू द शॅडोज' या दुसऱ्या सीझनमध्ये अमितनं साकारलेलं इन्स्पेक्टर कबीर सावंत हे पात्र काय कमाल करतंय याविषयी उत्सुकता आहे. ० दुसऱ्या सीझनमध्ये कबीर सावंत हे पात्र कोणत्या नव्या रुपात पाहायला मिळणार आहे? - ट्रेलरमध्ये दाखवल्यानुसार इन्स्पेक्टर कबीर सावंतच आता तुरुंगामध्ये आहे. ते पाहून चाहत्यांमध्ये याविषयी खूप चर्चा होते आहे. दुसऱ्या सीझनमध्ये मी साकारलेलं पात्र वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. पात्र जुनं असलं, तरी त्या व्यक्तिरेखेच्या नव्या छटा पाहायला मिळणार आहेत. ० प्रेक्षकांच्या तुझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. याकडे तू कसं बघतोस? - पहिल्या सीझनवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. तेव्हा माझं करिअरची गाडी रुळांवर नव्हती. फारशी कामं मिळत नव्हती. तेव्हा मला 'ब्रिथ'साठी विचारणा झाली. अगदी जीव ओतून कबीर सावंतचं पात्र उभं केलं. मी घेतलेल्या मेहनतीचं सर्वांकडून कौतुक झालं. त्यामुळे अपेक्षा वाढणं साहजिक आहे. या अपेक्षांकडे मी प्रेरणा म्हणून बघतो. लेखकानंही विशेष मेहनत घेतली आहे. ० महाराष्ट्रीय पात्र साकारण्यासाठी काय विशेष मेहनत घेतलीस? - सीरिजमध्ये माझ्याबरोबर अभिनेता हृषीकेश जोशी आहे. त्यांनी मला मराठी भाषा शिकायला मदत केली. भूमिकेचा करिष्मा उभा करण्यासाठी त्यांची खूप मदत झाली. गरजेनुसार आपल्यामध्ये सुधारणा कशा कराव्या याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. ० पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना कोणती आव्हानं होती? माझं बालपण अशाच वातावरणात गेलं आहे. त्याचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव आहे. त्या क्षेत्राविषयी मला माहिती आहे, समज आहे. ती समज पात्र साकारताना मला उपयोगी पडली. आव्हानं तर खूप होती, त्यावेळी माझी लहानपणापासूनची निरीक्षणं उपयोगी पडली. ० ओटीटीवर थरारक सीरिजचा भडिमार होतोय असं वाटत नाही का? - प्रेक्षकांसमोर उत्तमोत्तम आशय सादर करण्याची वेळ आहे. प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या आशयाची निर्मिती केली की ते उचलून धरतात. अशा वेळी ते क्राइम थ्रिलर किंवा सायकोलॉजिकल थ्रिलर आहे म्हणून आवडलं, असं काही नसतं. लोकांना आवडतंय ते अधिक दाखवलं जातं. आता लोकांना थरार आवडतोय तर त्यांना तेच दाखवलं जातंय. ० भडक भाषा आणि दृश्यांचा अतिरेक होतोय असं वाटतं का? - ओटीटीवर हवं ते दाखवण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कथेच्या गरजेनुसार भडक भाषा किंवा दृश्यांचा वापर केला जातो. ते बघायचं की नाही हे सर्वस्वी प्रेक्षकांच्या हातात आहे. फक्त तेच दाखवलं जातंय असंही नाही. ० सध्या परदेशी सीरिजमधून किंवा पुस्तकातून कथा घेतल्या जातायत, याबद्दल काय सांगशील? - कथा प्रेक्षकांना भावणारी असेल, तर ती देसी स्टाइलमध्ये मांडायला हरकत काहीच नाही. ० चित्रपट किंवा सीरिज निवडताना तू काय बघतोस? - विचारणा झालेल्या चित्रपटाची कथा मला भावतेय का हे मी आधी तपासून बघतो. कारण ती कथा मला भावली, तर तितक्या प्रभावीपणे मी पडद्यावर उभी करु शकतो आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gEfc1l