मुंबई:सरकारनं आखून दिलेल्या नियमांनुसार अलीकडेच मालिकांच चित्रीकरण सुरू झालं होतं. येत्या काही दिवसांत आणखी काही मालिकांच्या चित्रीकरणाला प्रारंभ होणार होता. पण एक नवीन आवाहन कलाकार आणि मालिकेच्या संपूर्ण टीम पुढं येऊन ठाकलं आहे. टीममधील काही व्यक्तींना करोना झाल्याचं समोर आल्यानंतर पुन्हा शूटिंग थांबवाव लागत आहे. टीव्हीवरची प्रसिद्ध हिंदी मालिका '' या मालिकेतल्या हेअर ड्रेसरलाच करोनाची लागण झाल्यानं शूटिंग पुन्हा एकदा थांबण्यात आलं आहे. मालिकेतील प्रमुख अभिनेत्री हिच्या हेअर ड्रेसरला करोनाची लागण झाल्याची माहिती आहे. हेअर ड्रेसरला करोनाची लागण झाल्याचं समजल्यापासून सेटवरील सर्वांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या भीतीनं सौम्या मालिका सोडण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. सौम्याचा मुलगा अजून लहान आहे. त्यामुळं तिला मुलाच्या आरोग्यासोबत कोणतीही तडजोड करायची नाहीए. सध्या तरी तिला आणि हेअर ड्रेसरच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई आणि राज्यांतील काही जिल्ह्यांत चित्रपट, टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही प्रकल्पांच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, सध्या त्याच्या पूर्वतयारीचं काम लगबगीनं सुरू आहे. या पूर्वतयारीत कलाकार आणि चित्रीकरणात सहभागी होणाऱ्या तंत्रज्ञ मंडळींना विमा संरक्षणाचं कवच देणं ही महत्त्वाची बाब आहे. परंतु विम्याचा हप्त्याचा भार कुणी उचलायचा, या मुख्य मुद्द्यावरुन काही ठिकाणी वाहिन्या आणि निर्माते यांच्यामध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. परिणामी काही मालिकांतील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या विमा संरक्षणाचं घोडं अडलं आहे. गोरेगाव चित्रनगरीत, ठाणे ओवळे गाव आणि मीरारोड येथील काही स्टुडिओंमध्ये बाहुतांश हिंदी-मराठी टीव्ही मालिकांचं चित्रीकरण होतं. सध्या मालिकांना चित्रीकरणासाठी परवानगी मिळाली आहे. काही मालिकांनी एव्हाना चित्रीकरणाचा श्रीगणेशादेखील केला आहे. नव्या मार्गदर्शक नियमावलीनुसार सेटवर काम करणारे कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांचा विमा उतरवणं बंधनकारक आहे. तशी रीतसर मागणीही 'सिने अँड टेलिव्हिजन आर्टिस्ट्स असोसिएशन' आणि 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एप्लॉइज' या संघटनांनी केली आहे. परंतु, सध्या मिळालेल्या माहितीनुसार ब्रॉडकास्टर (टीव्ही वाहिन्या) आणि मालिका निर्मात्यांमध्ये, विम्याच्या हप्त्याच्या रकमेचा भार कोणी आणि कसा उचलायचा यावरुन चर्चा सुरू आहे. विमा उतरवण्याची प्रक्रिया काहीशी किचकट आणि बजेट वाढवणारी असल्यामुळे निर्माते सध्या चिंतेत आहे. याबाबत निर्माते माहिती देण्यास तयार नाहीत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3e9Sf4A