मनाली- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलं. घराणेशाहीवर अजूनही मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत. सुशांतच्या निधनानंतर सर्वातआधी कंगनाने यी मुद्द्यावर आपलं मत मांडलं होतं. सुशांत बॉलिवूडमधील गटबाजी आणि घराणेशाहीचा शिकार झाला आहे. एवढंच नाही तर सुशांतची ही आत्महत्या नसून ठरवून केलेली हत्या आहे, असंही कंगना म्हणाली होती. मुंबई पोलिसांनी दिलं नाही कोणतंही उत्तर यानंतर सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी येत होती. कंगनाने आपल्या वक्तव्यात सिनेसृष्टीतील काही बड्या नावांचा उल्लेखही केला होता. मात्र यानंतरही कंगनाला पोलिसांकडून कोणतेही प्रश्न विचारण्यात आले नाहीत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, सुशांतच्या केस संदर्भात चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी समन पाठवला होता. पण सध्या मी मनालीमध्ये आहे आणि मुंबईत जाऊ शकत नाही. तसेच तिचा जबाब नोंदवून घेण्यासाठी मुंबईवरून मनालीला कोणाला पाठवण्याचा सल्लाही दिला. मात्र यावर पोलिसांकडून कोणतंही उत्तर आलं नाही. वाटलं तर पद्मश्रीही परत करेन कंगनाने सुशांतच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी आणि गटबाजी करणाऱ्यांवर थेट आरोप केले होते. तसेच त्या व्यक्तींबद्दल ती जे बोलले ते कंगना सिद्ध करू शकले नाही तर पुरस्कार परत करण्याची तयारीही तिने दाखवली. कंगना म्हणाली की, ती जे काही बोलली ते आधीच प्रसिद्ध झालेलं आहे आणि ती हे पुन्हा सिद्धही करून दाखवेल. कंगनाला याच वर्षी भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. मानसिक आजारांशी लढत होता सुशांत- दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येचं मुख्य कारण हे त्याचं डिप्रेशन असल्याचं सांगितलं जात असून याच्याच उपचारासाठी ते हिंदुजा रुग्णालयात अॅडमिट झाला होता. सुशांतनं आत्महत्याच केली असून हत्येचा कटाचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. सुशांतनं आत्महत्या का केली याचंही उत्तर आम्हाला जवळजवळ मिळालं आहे, असंही ते म्हणाले. डिप्रेशनच्या दोन भयावह आजारांनी सुशांतला ग्रासलं होतं. या दोन मानसिक आजारांनीच त्याचा जीव घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं. पॅरानोया आणि बायपोलक डिसऑर्डर या दोन आजारांनी सुशांत ग्रासला होता. या आजारांवर हिंदुजा रुग्लालयात त्यानं आठवडाभर उपचार घेतले होते. 'पॅरानोया' हा एक संशयाचा आजार आहे. यात आपल्या जवळच्या व्यक्ती आपला द्वेश करतायत असं वाटू लागतं. एकांतात असताना कोण तरी आपल्याला संपवण्यासाठी प्रयत्न करतंय, असा विचार सतत डोक्यात येत असतो. तसंच बायपोलक आजारात व्यक्तीच्या स्वभावात सतत चढउतार पाहायला मिळतात. कधी तो एकदम तणावात असतो तर कधीतरी व्यक्तीचा आत्मविश्वास अचानक वाढतो. त्यामुळं हे दोन आजार त्याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचं म्हटलं जात आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/395FC9Z