नवी दिल्लीः चीनची कंपनी शाओमीने बुधवारी ग्लोबल मार्केटमध्ये एकत्रित आपले ९ प्रोडक्ट बाजारात उतरवले आहे. यात Mi Smart Band 5, Electric Scooter, TV Stick सह तीन नवीन स्मार्टफोनचा यात समावेश आहे. कंपनीने अंतर्गत , आणि हे तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या तिन्ही स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल प्रोसेसर आणि प्रीमियम फीचर्स देण्यासोबतच कमी किंमतीत हे बाजारात उतरवले आहेत. रेडमी ९ए ची सुरुवातीची किंमत ९९ यूरो (जवळपास ८ हजार ५०० रुपये), रेडमी ९ सी ची सुरुवातीची किंमत १० हजार २०० रुपये आणि रेडमी ९ ची सुरुवातीची किंमत १४९ यूरो (जवळपास १२ हजार ८०० रुपये) ठेवण्यात आली आहे. वाचाः Redmi 9 चे फीचर्स स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर आणि 5020mAh ची बॅटरी दिली आहे. या बॅटरीला 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. यात दोन मॉडल 3GB + 32GB आणि 4GB + 64GB देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. वाचाः Redmi 9C चे फीचर्स या स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर आणि 5000mAh ची बॅटरी दिली आहे. यात दोन मॉडल 2GB + 32GB आणि 3GB + 64GB देण्यात आले आहेत. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः Redmi 9A चे फीचर्स या स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G25 प्रोसेसर दिला आहे. तसेच 5000mAh ची बॅटरी दिली आहे. स्मार्टफोन एकाच मॉडलमध्ये 2GB + 32GB येते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eztrmE