नवी दिल्लीः युजर्संवर धोक्याची टांगती तलवार आहे. युजर्संना व्हॉट्सअॅपच्या फेक व्हर्जन संबंधी अलर्ट केले जात आहे. संबंधित माहिती आणि अपडेटला ट्रॅक करणारी वेबसाईट ने व्हॉट्सअॅपच्या मॉडिफाईड व्हर्जन संबंधी एक अलर्ट जारी केला आहे. WABetaInfo ने आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, प्रायव्हसी आणि सिक्योरिटी साठी व्हॉट्सअॅपचे मॉडिफाईड व्हर्जन चांगला पर्याय होवू शकत नाही. वाचाः या ट्विटमध्ये हेही सांगितले की, व्हॉट्सअॅपच्या मॉडिफाईड व्हर्जन आकर्षक वाटू शकतात. परंतु, हे चांगले असू शकत नाही. हे थोडे रिस्की आहेत. वाचाः मेन-इन-मिडल अटॅकचा खेल मॉडिफाईड व्हॉट्सअॅपवरून हॅकर्स सहज आपले टार्गेट बनवू शकतात. हे फेक व्हॉट्सअॅप डेव्हलपर्सला मेन इन द मिडल अटॅक वरून डेटा चोरी करू शकतात. या अटॅकच्या मदतीने हेकर सॉफ्टवेअरला एडिट करुन चॅटिंगचा अॅक्सेस करू शकतात. मेसेज वाचण्यासाठी त्यांना एडिट करु शकतात. वाचाः अकाउंट बंद होण्याचा धोका जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यात हेही सांगितले की, व्हॉट्सअॅप मॉडिफाईड व्हर्जनला कंपनीने अधिकृत केलेले नाही. तसेच जर कोणताही युजर याचा वापर करीत असेल तर त्यासाठी व्हॉट्सअॅप अकाउंट बंद केले जावू शकते. अनेकदा युजर्स काही आणखी फीचर्सच्या लालसेपोटी ओरिजनल ऐवजी फेक व्हर्जनचा वापर सुरू करीत असतो. हे सिक्योरिटी आणि खासगी साठी बरोबर नाही. वाचाः बीटा व्हर्जन मध्ये सर्वात आधी मिळणार फीचर व्हॉट्सअॅपच्या अधिकृत व्हर्जनवर तुम्ही अॅपल अॅप स्टोर किंवा गुगल प्ले स्टोरवरुन डाऊनलोड करू शकता. तसेच तुम्ही जर व्हॉट्सअॅपच्या कोणत्याही फीचरला दुसऱ्या युजर्सच्या तुलनेत आधी युज करण्याचा विचार करीत असाल तर तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या बिटा व्हर्जनचा वापर करावा लागेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3erI3oi