नवी दिल्लीः सध्या स्मार्टफोन मेकर कंपन्या कॅमेऱ्यासोबत बॅटरीवर सुद्धा जास्त फोकस करीत आहेत. 5000mAh बॅटरी आता कोणत्याही मोबाइलमध्ये मिळतेय. खूप साऱ्या अँड्रॉयड आणि आयफोन युजर्संना बॅटरीची चिंता सतावते आहे. बॅटरी लवकर उतरत असल्याने अनेक जण त्रस्त आहेत. परंतु, काही ट्रिक्सच्या मदतीने फोनची बऱ्यापैकी सुधारता येवू शकते. जाणून घ्या या ट्रिक्सविषयी. वाचाः चार्जिंगची पद्धत बदला सर्वात आधी स्मार्टफोनला चार्ज करण्याची कोणती पद्धत चांगली आहे. ते जाणून घ्या. बरेच जण फोनची बॅटरी संपल्यानंतर त्याला चार्ज करतात. तर काही लोक रात्रभर फोन चार्जिंगला लावून झोपी जातात. या दोन्ही सवयी आपल्याला बदलाव्या लागतील. फोनची बॅटरी ५० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतर त्या फोनला चार्जिंग करणे चांगले आहे. तसेच फोन १०० टक्क्यांपर्यंत चार्ज करू नका. वाचाः बॅटरी सेव्हिंग मोड अँड्रॉयड मध्ये हे फीचर बॅटरी सेव्हिंग मोड आणि आयफोन मध्ये लो पॉवर मोड या नावाने येते. हे ऑप्शन बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या अॅप्सला बंद करण्याचे काम करते. त्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी वाचते. बॅटरी सेव्हिंग मोडचा वापर अशावेळी करा. ज्यावेळी तुमच्या फोनची बॅटरी १५ ते २० टक्के राहिली आहे. तसेच चार्जिंगची कोणतीही व्यवस्था नसल्यास याचा वापर करा. वाचाः हे फीचर बंद ठेवा बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी ऑटो ब्राइटनेस सेटिंगला ऑन करा. तसेच फोनचा वाय फाय आणि लोकेशनचा वापर होत नसेल तर त्याला ऑफ करा. नेटवर्क सर्च करण्यासाठी हे फीचर बॅटरी खर्च करतात. तसेच बॅकग्राऊंडला सुरु असलेले अॅप्स सुद्धा बंद करा. वाचाः डार्क मोडचा वापर करा बऱ्याच स्मार्टफोन आणि अॅप्समध्ये डार्क मोड फीचर आले आहे. या मोडचा वापर केल्यास बॅटरी कमी खर्च होऊ शकते. कमीत कमी व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम यासारख्या जास्त वापरल्या जाणाऱ्या अॅप्सवर डार्क मोड फीचर ऑन करा. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33F0VOI