मुंबई: अभिनेता याच्या आत्महत्येनंतर संशयाची वावटळ उठली असतानाच या सर्वाच्या केंद्रस्थानी असलेली सुशांतची गर्लफ्रेंड हिची कसून चौकशी करण्यात येत आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय () या दोन तपास यंत्रणांकडून याप्रकरणी तपास सुरू झाला असून काल ईडीने तब्बल साडेआठ तास रियावर प्रश्नांचा भडीमार केला. या चौकशीत रियानं तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले असून सुशांतच्या कुटुंबियावर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतच्या कुटुंबियांना त्याच्या विम्याचे पैसे हवे आहेत, त्यामुळं त्यांनी माझ्यावर खोटे आरोप करत खटला दाखल केला असं, रियानं म्हटलं असल्याची माहिती आहे. तसंच माझं आणि सुशांतचं नातं त्याच्या घरच्यांना मान्य नव्हतं. पण सुशांतला माझ्यासोबतचं नातं तोडायचं नव्हत. त्यामुळं त्यानं त्याच्या कुटुंबियांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता, असं रियानं म्हटलं आहे. मला फसवण्यामागं सुशांतच्या भावोजींचं र्व षड्यंत्र असल्याचा आरोप रियानं केला आहे. सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात पाटणा पोलिसांनी व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. त्या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं काल मनी लॉन्डरिंग प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. काल चौकशीच्या पहिल्या फेरीत रियासह तिचा भाऊ शौविक, वडील तसेच सुशांतची पूर्वाश्रमीची मॅनेजर यांचीही चौकशी करण्यात आली. ८ तासांच्या चौकशीनंतर हे सर्वजण ईडी कार्यालयातून बाहेर आले तेव्हा माध्यमांनी मोठी गर्दी केली होती. काहीवेळ तिथे गोंधळही निर्माण झाला. पोलिसांनी या सर्वांना वाट करून दिली. दरम्यान, जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, ही विनंती घेऊन रियानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने रियाचा विनंती अर्ज फेटाळला. त्यामुळेच ईडीकडून आधीच बजावण्यात आलेल्या समन्सनुसार रियाला ईडीचे कार्यालय आज गाठावे लागले. रिया व इतरांच्या चौकशीनंतर याप्रकरणात आज सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी याची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. ईडीकडून त्याला तसे समन्स बजावण्यात आले आहे. दुसरीकडे सीबीआयनेही याप्रकरणी एफआयआर नोंदवून गुरुवारपासूनच तपासाला सुरुवात केली आहे. सुशांतहून जास्त त्याच्या मॅनेजरला केले कॉल रिया चक्रवर्तीचे डिटेल्स आता समोर आले आहेत. यात सुशांतहून जास्त कॉल तिनं त्याची एक्स मॅनेजर श्रुती मोदीला केल्याचे कळते. यासोबतच सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडासाही तिनं सर्वाधिक कॉल केले. सुशांतचे वडील आणि सीबीआयनं दाखल केलेल्या एफआयआरमध्ये श्रुती आणि सॅम्युअल या दोघांचेही नाव सामिल आहे. या दोघांव्यतिरिक्त रियाचे वडील, भाऊ आणि आई यांच्याविरोधातही एफआयआर नोंदवण्यात आली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31rsqZw