नवी दिल्लीः जगभरात नंबर वन बेस्ट सेलिंग अँड्रॉयड स्मार्टफोन भारतात स्वस्त झाला आहे. याची सुरुवातीची किंमत आता मिड रेंज फोनच्या टॉप चॉइसेज मध्ये समावेश करते. जर तुम्हाला पॉवरफुल फोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. सॅमसंगचा ए सीरीजचा फोन 2020 मध्ये सर्वात जास्त विक्री होणारा ठरला आहे. कंपनीने आता या फोनची किंमत कमी केली आहे. वाचाः दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने याआधीही या फोनच्या किंमतीत कपात केली होती. परंतु, त्यावेळी केवळ ८ जीबी रॅमच्या फोनमध्ये कपात करण्यात आली होती. आता फोनच्या बेस व्हेरियंटची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन स्वस्तात खरेदी करता येवू शकतो. Samsung Galaxy A51 दोन व्हेरियंटमध्ये येतो. दोन्ही फोनच्या किंमतीत अंतर आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत कमी केली आहे. याची किंमत २३ हजार ९९९ रुपयांवरून २२ हजार ४९९ रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच फोनच्या किंमतीत १५०० रुपयांची कपात केली आहे. वाचाः स्मार्टफोनला खूप पसंती जुलै महिन्यातील अखेरच्या आठवड्यात या फोनचे टॉप व्हेरियंटला १००० रुपयांची कपात करण्यात आली होती. फोनचा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २७ हजार ९९९ रुपयांवरून २६ हजार ९९९ रुपये करण्यात आली आहे. २०२० च्या तिमाहीत जगात बेस्ट सेलिंग अँड्रॉयड स्मार्टफोन म्हणून या फोनला गौरवण्यात आले आहे. या फोनमध्ये बॅलेन्स्ड फीचर्स, जबरदस्त कॅमेरा आणि डिस्प्ले चांगला असल्याने ग्लोबल मार्केटमध्ये खास करून यूरोपमध्ये याला खूप पसंती मिळाली आहे. वाचाः Samsung Galaxy A51 चे फीचर्स या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल HD+ सुपर AMOLED इनफिनिटी-ओ डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1080x2400 पिक्सल्स आहे. या फोनमध्ये Exynos 9611 प्रोसेसर सोबत ८ जीबी पर्यंत रॅम दिला आहे. रियर पॅनेलवर ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 12+5+5 मेगापिक्सल सेन्सरचे क्वॉड कॅमेरा सेटअप दिले आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिलाआहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh बॅटरी दिली आहे. यात फास्ट चार्जंगचा सपोर्ट सुद्धा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30AfXDB