Full Width(True/False)

सीबीआयच्या कारवाईनंतर रियाच्या वकिलांनी पाठवली नोटीस

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. केंद्राने हिरवा कंदिल दाखवल्यानंतर सीबीआयकडे ही केस देण्यात आली. सुशांतची गर्लफ्रेंड आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आली. यावर आता रियाचे वकील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. वकील म्हणाले, करतेय बेकायदेशीर काम सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवविरोधात बिहारमध्ये एफआयआर दाखल केली. सीबीआयकडे केस गेल्यानंतर सीबीआयने रिया आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केली. यावर रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी नोटीस पाठवत या कारवाईला बेकायदेशीर म्हटलं आहे. या स्टेटमेन्टमध्ये त्यांनी लिहिलं की, बिहार सरकारच्या अधिकारक्षेत्रात जी केस कधीच नव्हती. ती केस मुंबई पोलिसांना देण्याऐवजी सीबीआयला देण्यात आली. जे बेकायदेशीर आहे. स्टेटमेन्टमध्ये पुढे लिहिण्यात आलं की, सध्या सर्वोच्च न्यायालयात रिया चक्रवर्तीच्या ट्रान्सफर याचिकेवर सुनावणी होत आहे. न्यायालयानने सर्व पक्षांना त्यांचे जबाब नोंदवण्यास आणि मुंबई पोलिसांना त्यांचे चौकशी रिपोर्ट सादर करण्यास सांगितले आहे. अजूनही प्रक्रिया अपूर्ण आहे आणि तरीही सीबीआयने बेकायदेशीर काम करत बिहार पोलिसांना उत्तेजनच दिले आहे. चौकशी अपूर्ण असल्याचा दिला हवाला त्यांच्या नोटीसमध्ये लिहिण्यात आले की, सीबीआय ही देशाची मुख्य तपास यंत्रणा आहे. जोवर महाराष्ट्र सरकार सीबीआय चौकशीची मागणी करत नाही तोवर सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या कारवाईत त्यांनी कोणतेही पाऊल उचलणे टाळले पाहिजे. हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि कोणत्याही कायदेशीर सिद्धांताच्या पलीकडे आहे. रियाला द्यावे लागतील बिहार पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं- सुशांतच्या केसमध्ये सर्वात मोठी घडामोड ही आहे की केंद्राने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने रियाच्या वकिलांकडून सादर केलेल्या अंतरिम संरक्षणाची विनंती नाकारली आहे. न्यायालयाने सांगितले की, प्रतिभावान अभिनेत्याचा असामान्यरित्या मृत्यू झाला आहे. सत्य सर्वांसमोर आलं पाहिजे. आता बिहार पोलीस रियाची चौकशी करेल. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्याला क्वारन्टीन करून जनतेसमोर चांगला संदेश ठेवला नाही. महाराष्ट्र सरकारलाही न्यायालयाने यासंबंधी प्रश्न विचारले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ig48IB