Full Width(True/False)

रियलमीच्या दोन बजेट फोन सोबत इयरफोनची आज लाँचिंग, घ्या जाणून

नवी दिल्लीः रियलमी भारतात नवीन इयरफोन लाँच करीत आहे. कंपनीने Realme Buds Classic असे याला नाव दिले आहे. आज भारतात इयरफोनला लाँच करण्यात येणार आहे. रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी या इयरफोनला टीझ केले आहे. तसेच या इयरफोनला अॅमेझॉन वर सुद्धा पाहिले गेले आहे. अॅमेझॉनवर पाहिले गेलेल्या फोटोवरून माहिती होत आहे की, हे वायर्ड इयरफोन आहेत. जे ३.५ एमएम जॅक कनेक्टरसोबत येते. वाचाः अॅमेझॉन इंडियावर लिस्टिक नुसार, या इयरफोनमध्ये १४.२ एमएम लार्ज ड्रायव्हर सोबत येतील. कंपनीच्या माहितीनुसार हे इयरफो हेवी बेस सोबत येतील. या इयरफोनमध्ये हाफ इन इयर डिझाईन देण्यात आली आहे. कंपनी याला ब्लॅक आणि पांढरा अशा दोन रंगात लाँच करणार आहे. वायर्ड हेडफोन प्रमाणे बिल्ट इन सिंगल बटनसोबत येते. ज्यात युजर्स कॉल्स आणि म्यूझिक कंट्रोल करु शकतात. इयरफोन मध्ये एचडी मायक्रोफोन दिला गेला आहे. अॅमेझॉन लिस्टिंगवरून हेही समोर आले आहे की, हेडफोन केबल ऑर्गनायझर सोबत येतील. वाचाः वाचाः वाचाः आज लाँचिंग रियलमी आपले नवीन इयरफोन आज लाँच करणार आहेत. सध्या सर्व कंपन्या वायरलेस हेडसेट्स आणि इयरबड्स लाँच करीत आहेत. अशा स्थितीत रियलमी हे वायर्ड हेडफोन युजर्संसाठी लाँच करीत आहे. युजर्संसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. वाचाः वाचाः रियलमी लाँच करणार सी सीरीजचे दोन स्मार्टफोन कंपनी आज भारतात रियलमी सी १२ आणि रियलमी सी १५ लाँच करण्याची तयारी करीत आहे. हे दोन्ही फोन कमी किंमतीत स्मार्टफोन असणार आहे. या दोन्ही फोनला भारतीय बाजारात आज लाँच करण्यात येणार आहेत. भारता आधी कंपनीने रियलमी सी १२ ला इंडोनेशियात लाँच केलेले आहे. त्यामुळे या फोनचे सर्व फीचर्स समोर आले आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aAXolX