Full Width(True/False)

सुशांतसिंह प्रकरणात अंमली पदार्थांचे कनेक्शन? चौकशीत नारकोटिक्स ब्युरोची एन्ट्री

मुंबईः प्रकरणी आता नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) लवकरच चौकशी सुरू करणार आहे. सुशांत प्रकरणात अंमली पदार्थांचा काही संबंध आहे, याची चौकशी एनसीबीकडून करण्यात येईल. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे संचालक राकेश अस्थाना यांनी ही माहिती दिलीय. 'आम्ही सुशांत प्रकरणाची चौकशीही सुरू करत आहोत', असं एनसीबीकडून सांगण्यात आलं. सुशांत प्रकरणात अंमली पदार्थांचा संबंध? ईडीने एनसीबीला पत्र लिहिलं आहे. सुशांतशी संबंधित काही जण अंमली पदार्थांचं सेवन करायचे. काही जण अंमली पदार्थ तस्कराच्या संपर्क होते. यामुळे एनसीबी आपला व्यापक तपास सुरू करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोची ऑपरेशन टीम आणि इतर संस्थांच्या टीम मिळून या प्रकरणात अंमली पदार्थांच्या संबंधांची चौकशी करतील. तपासाची व्याप्ती खूप मोठी असेल आणि दिल्ली, मुंबईच्या वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याना या तपासात सहभागी करण्यात आलं आहे, अशी माहिती राकेश अस्थाना यांनी इंडिया टुडेला दिला. गांजाचे कनेक्शन सुशांतसिंह राजपूतकडे नोकरी करणार्‍या नीरज सिंगने सुशांत हा गांधा ओढत असल्याचा दावा केला होता. नीरजने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबातून ही माहिती समोर आलीय. मृत्यूच्या काही दिवस आधी त्याने सुशांतसाठी गांजाची सिगारेट बनवून दिली होती. ज्या दिवशी सुशांतसिंहचा मृतदेह बेडरूममध्ये लटकलेला आढळला त्या दिवशी गांजा ठेवण्यात येणारा बॉक्स तपासला होता. तो बॉक्स रिकामा होता, असं नीरजने पोलिसांना सांगितलं. सुशांतसिंह राजपूतचा १४ जून मृत्यू झाला होता. सीबीआय आणि ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सीबीआयने सुशांतच्या घरी जाऊन पुन्हा क्राइम सीन रि-क्रिएट केला. तर ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ-वडिलांकडे चौकशी केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3huh7q6