Full Width(True/False)

Sadak 2 Trailer- संजय दत्तवरून हटत नाही नजर!

मुंबई- , आणि स्टारर २ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमाचा ट्रेलर काल म्हणजे ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र संजय दत्तच्या कर्करोगाच्या बातमीमुळे निर्मात्यांनी सिनेमाचा ट्रेलर एक दिवस नंतर १२ ऑगस्टला प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आलिया भट्ट आर्या नावाची व्यक्तीरेखा साकारत आहे तर आदित्य रॉय कपूर विशालच्या भूमिकेत दिसेल. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं. पण या लव्ह स्टोरीमध्ये खलनायकही आहेत. संजय दत्त रवी नावाच्या एका ट्रॅव्हल एजन्टची व्यक्तीरेखा साकारत आहे. संजयच आलिया आणि विशालला टूरिस्ट बुकिंगवर घेऊन जात असताना त्यांच्या वाटेत अनेक संकटं येतात. सिनेमात आदित्य आणि आलियाला वेगळं करण्याचा प्रयत्न करताना दाखवण्यात आला आहे. पण असं का हे मात्र ट्रेलरमध्ये सांगितलं नाही. सुरुवातीपासूनच या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होता. मात्र सिनेमाचा ट्रेलर फारसा गुंतवणून ठेवणारा नाही. त्यामुळेच सिनेमाबद्दलही आता प्रेक्षकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सिनेमाची कथा, त्यातल्या व्यक्तिरेखा कोणत्याच गोष्टी प्रथमदर्शनी आकर्षित करत नसल्याचं सध्या सोशल मीडियावर बोललं जात आहे. डिझ्नी हॉटस्टारवर २८ ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे. यात जिशु सेनगुप्ता, मकरंद देशपांडे, गुलशन ग्रोवर, प्रियांका बोस, मोहन कपूर आणि अक्षय आनंद यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. महेश भट्ट यांनी स्वतः या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. १९९१ मध्ये आलेल्या सडक सिनेमाचा हा सिक्वल आहे. पहिल्या सिनेमात पूजा बेदी आणि संजय दत्त यांची मुख्य भूमिका होता. आता जवळपास २१ वर्षांनंतर महेश भट्टांनी पुन्हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. १९९९ मध्ये आलेला काडतूस हा त्यांचा अखेरचा दिग्दर्शित केलेला सिनेमा होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ahQYrP