नवी दिल्लीः सॅमसंगने आपल्या जबरदस्त टीव्हीवर १० हजार रुपयांचा स्पेशल डिस्काउंटची घोषणा केली आहे. हा सॅमसंगचा लाइफस्टाइल टीव्ही The Serif आहे. सॅमसंग टीव्हीवरी हा ६ आणि ७ ऑगस्टच्या अॅमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान मिळणार आहे. या ऑफरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या टीव्हीला २९१६ रुपयांच्या सुरुवातीच्या नो कॉस्ट ईएमआयच्या पर्यायावर सुद्धा खरेदी केले जावू शकते. तसेच सॅमसंगच्या सेल दरम्यान १९ टक्के डिस्काउंट, आकर्षक ईएमआय आणि कॅशबॅक ऑफर्स सोबत प्रसिद्ध फ्रंट लोड हायजीन स्टीम वॉशिंग मशीनला ७ किलोग्रॅम व्हेरियंटमध्ये आणत आहे. वाचाः टीव्हीच्या सर्व मॉडल्सवर मिळणार डिस्काउंट अॅमेझॉन प्राइम सेल दरम्यान ग्राहकांना The Serif टेलिव्हिजच्या सर्व मॉडल्सवर १० हजार रुपयांचा स्पेशल डिस्काउंट मिळणार आहे. ४३ इंचाचा The Serif टीव्ही ६९ हजार ९९० रुपयात खरेदी केला जावू शकतो. ४९ इंचाचा टीव्ही ८९ हजार ९९० रुपयांत खरेदी केला जावू शकतो. तर ५५ इंचाचा लाइफस्टाइल टीव्ही १ लाख ९ हजार ९९० रुपयात खरेदी केलेा जावू शकतो. ग्राहकांना २४ महिन्यांची नो कॉस्ट ईएमआय पर्याय सुद्धा निवडू शकता येते. ईएमआय २९१६ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. वाचाः HDFC बँकेच्या कार्डवर १० टक्के तात्काळ कॅशबॅक सॅमसंगच्या ७ किलो ग्रॅम कॅपिसिटीच्या फ्रंट लोड हायजीन स्टीम क्लीन वॉशिंग मशीनवर १९ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. या डिस्काउंटनंतर याची किंमत २९ हजार ४९० रुपये होते. ग्राहकांना १२ महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय सुद्धा निवडता येवू शकतो. याचा ईएमआय अनुक्रमे ११६६ रुपये आणि २४५८ रुपयांपासून सुरू होते. तसेच यात कोणतीही प्रोडक्ट खरेदी करताना एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १० टक्के तात्काळ कॅशबॅक मिळणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gw0km2