मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, या प्रकरणी अनेकजण फार निंदनीय राजकारण खेळत आहेत. या केसच्या माध्यमातून त्यांच्यावर आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबियांवर लांछन उडवलं जात आहे. पण याप्रकरणी ते धैर्याने या सर्व गोष्टींचा सामना करत आहेत. तसेच या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचं आदित्यने स्पष्ट केलं. आता कंगना रणौतने आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत त्यांना काही प्रश्न विचारले आहेत. कंगनाच्या डिजीटल टीमने आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, 'पाहा.. निंदनीय राजकारणाबद्दल कोण बोलत आहे. तुमचे वडील मुख्यमंत्री कसे झाले ही पण गलिच्छ राजकारणाची केस स्टडी आहे. या सर्व गोष्टी जाऊ देत. तुम्ही वडिलांना सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी फक्त हे प्रश्न विचारा.. पहिला प्रश्न- कुठे आहे?' कंगनाच्या टीमने दुसरं ट्वीट करत म्हटलं की, 'मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल करून का घेतली नाही? तिसरा प्रश्न जेव्हा सुशांतच्या जीवाला धोका आहे यासंदर्भात फेब्रुवारी महिन्यात तक्रार करण्यात आली होती तर मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूदिवशीच त्या घटनेला आत्महत्या असं नाव का दिलं.?' कंगनाच्या डिजीटल टीमने तिसरं ट्वीट करत म्हटलं की, 'चौथा प्रश्न- आपल्याकडे सुशांतचे फॉरेन्सिक रिपोर्ट आणि फोन डेटा का नाहीये. यावरून मृत्यूच्या एक आठवड्याआधी तो कोणाकोणाशी बोलला ते कळू शकेल. पाचवा प्रश्न- बिहारचे आयपीएस विनय तिवारी यांना क्वारन्टीनच्या नावाखाली लॉक करून का ठेवलं आहे? सहावा प्रश्न- तुम्ही सीबीआय चौकशीला का घाबरत आहात? सातवा प्रश्न- रिया आणि तिच्या कुटुंबियांनी सुशांतचे पैसे का लुटले?' कंगनाच्या टीमने अखेरच्या ट्वीटमध्ये लिहिले की, 'या प्रश्नांचं राजकारणाशी काही देणं- घेणं नाहीये. त्यामुळे कृपया या प्रश्नांची उत्तरं द्या.' याआधी सुशांत सिंह राजपुतची एक्स मॅनेजर दिशा सालियानच्या आत्महत्येची चौकशी का केली नाही? दिशावर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा, गंभीर आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी सरकारवर केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहे. राजकीय दबावामुळं मुंबई पोलिस चौकशी करू शकत नाहीत, असा आरोप सातत्यानं भाजपकडून होत असताना नारायण राणे यांनीही आज एक पत्रकार परिषद घेऊन सरकारवर निशाणा साधला आहे. प्रकरणाची चौकशी ज्या दिशेनं सुरु आहे त्यातून कोणाला तरी वाचवायचं आहे. असा आरोपही त्यांनी केला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kdAYvO