मुंबई: अभिनेता मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन पुढं आल्यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. त्यानंतर रियाच्या तपासात या प्रकरणात अनेक महत्त्वाचे धागेदोरे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या () हाती लागले आहेत. दरम्यान, रियाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सुशांतच्या निधनानंतर रियाच्या आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्या. तिचे अनेक जुने फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत.असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळं रियाला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात येत आहे. रिया या व्हिडिओत 'पिंकी है पैसे वालों की' या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. सात वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ असून सुशांतच्या चाहत्यांकडून रियाची खिल्ली उडवली जात आहे. रियानं सुशांतच्या पैशांसाठी त्याला ताब्यात ठेवलं आणि फसवलं, असा आरोप सुशांतच्या कुटुंबियांचा रियावर आहे. परंतु ईडीच्या चौकशीत अद्यापही असे कोणतेही पुरावे सापडले नसले तरी एनसीबीच्या चौकशीत ड्रग्ज संदर्भातील प्रकरणात रिया सध्या तुरुंगात आहे. छाप्याच्या तयारीत? प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) सिनेसृष्टीतील अभिनेते व निर्माते यांच्यावर छाप्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सध्या एनसीबीच्या कोठडीत असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं बॉलिवूडशी संबंधित २५ अभिनेते, अभिनेत्री व निर्माते यांची नावे अधिकाऱ्यांना सांगितली असून त्यानुसार तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितलं. एनसीबीतील सूत्रांनुसार, 'या तपासासाठी पाच अधिकाऱ्यांचं विशेष पथक तयार केलं आहे. या पथकानं रियानं सांगितलेल्या २५ जणांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये हे २५ जण अमली पदार्थांचे सेवन करीत होते किंवा सेवन करतात का?, त्यांना अमली पदार्थ पुरविणारे कोण? आणि यांचा सुशांतसिंह किंवा रिया-शौविकशी काही संबंध आहे का? याचा तपास केला जात आहे.' दरम्यान, रियाने जी २५ नावे घेतली आहेत त्यामध्ये व रकूलप्रीत सिंह या दोन अभिनेत्रींचा समावेश आहे. याखेरीज डिझायनर सिमोन खंबाटा, चित्रपट निर्माते मुकेश छाबरा व सुशांतची माजी व्यवस्थापिका रोहिणी अय्यर यांचाही या २५ जणांच्या यादीत समावेश असून या सर्वांना समन्स बजावले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hF1pYQ