Full Width(True/False)

बिकीनी आहे की लुंगी? 'त्या' लुकमुळे मंदिरा बेदी पुन्हा ट्रोल

मुंबई टाइम्स टीम अभिनेत्री मंदिरा बेदीनं वयाची चाळीशी केव्हाच ओलांडलीय. म्हणायला ती ४८ वर्षांची आहे. पण, तिच्याकडे पाहिल्यानंतर कुणाचा त्यावर चटकन विश्वास बसणार नाही. मंदिरा नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. ब-याचदा तिला या फोटोंमुळे ट्रोल करण्यात आलं आहे. सध्याही ती तिच्या अशाच काही फोटोंमुळे ट्रोल होतेय. मंदिरानं तिचे साडीतले दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत आणि हे फोटो शेअर करताच काही लोकांना तिचा लूक आवडला. पण, काहींनी तिला फैलावर घेतलं. अनेक लोकांना तिचा हा ओव्हर स्टाईलिश लूक आवडलेला नाहीय. या सर्वांनी तिला खूप ट्रोल केलंय. ही साडी आहे, आहे की ? असा सवाल ट्रोलर्सनी केलाय. मंदिरा याआधी तिच्या बोल्ड फोटोंमुळे ट्रोल झाली आहे. मात्र या ट्रोलिंगचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. म्हणूनच तिनं कधीही स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करणं सोडलं नाही. मंदिराचं स्टाइल स्टेटमेंट सर्वांत वेगळं आहे. मग, तो इव्हेंट असो वा काही कार्यक्रम असो, प्रत्येक ठिकाणी ती एका वेगळ्या रुपात बघायला मिळते. या वयातही मंदिरा कमालीची फिट आहे. फिट राहण्यासाठी मंदिरा केवळ जिमवर अवलंबून नाही. पोहणं, योग असं सगळं काही ती करत असते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/364uk6s