नवी दिल्लीः ला नुकतेच नावाने रिब्रँड करण्यात आले आहे. Vi चा प्रयत्न आहे की, एअरटेल आणि रिलायन्स जिओ वर शिफ्ट होत असलेल्या आपल्या ग्राहकांना आपल्याकडे कायम ठेवावे. कंपनीने Vi ब्रँड्सोबत नेटवर्क परफॉर्मन्स चांगला झाल्याचा दावा सुद्धा केला आहे. काही दिवसांपूर्वी टेलिकॉम कंपनीने आपल्या अनेक प्लानमध्ये झी ५ चे प्रीमियम मेंबरशीप फ्री देण्याची घोषणा केली होती. आता कंपनी आपल्या प्रीपेड युजर्संच्या आकउंटमध्ये ३ जीबी फ्री डेटा क्रेडिट करीत आहे. या फ्री डेटाची वैधता ३ दिवसांची आहे. वाचाः ३जीबी डेटासंबंधी माहिती अशी चेक करा Viकडून ३ जीबी डेटा बेनिफिट ज्या युजर्संना दिला जात आहे. हे पूर्णपणे रँडम आहे. त्यामुळे होऊ शकते की, ही ऑफर तुम्हाला मिळाली नसेल. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, काही युजर्संनी वोडाफोन अकाउंटमध्ये फ्रीमध्ये ३ जीबी डेटा मिळाल्याची माहिती दिली आहे. MPCG, गुजरात आणि मुंबई सह अनेक सर्कलमध्ये युजर्संनी ही माहिती शेयर केली आहे. वाचाः ४९ रुपयांच्या ऑल राउंडर पॅक रिचार्ज केल्यानंतर Vi ३ जीबी फ्री डेटा देत आहे. ४९ रुपयांच्या Vi रिचार्ज पॅकमध्ये ३८ रुपयांचा टॉक टाईम, १०० एमबी डेटा आणि २८ दिवसांची वैधता येते. जर ४९ रुपयांचा Vi रिचार्ज पॅकला कंपनी किंवा मोबाइल अॅप वरून रिचार्ज केले तर तुम्हाला अतिरिक्त २०० एमबी डेटा मिळणार आहे. कंपनी ४८ रुपयांत २८ दिवसांची वैधता अॅड ऑन पॅक ऑफर करीत आहे. ज्यात ३ जीबी डेटा मिळतो. परंतु, काही युजर्संना ही ऑफर केली जात आहे. वाचाः टेलिकॉम टॉककडून दिलेल्या स्क्रीनशॉटच्या माहितीनुसार, फ्रीमध्ये मिळत असलेल्या ३ जीबी डेटाची वैधता ४९ रुपयांच्या ऑल राउंडर पॅक इतकीच आहे. तर व्हीआय कडून पाठवलेल्या एसएमएसमध्ये म्हटले की, हा डेटा ३ दिवसांसाठी आहे. ऑल राउंडर पॅक २८ दिवसांच्या वैधतेसोबत येते. तुम्हाला सुद्धा ३ जीबी फ्री डेटा मिळाला की नाही याची माहिती तुम्ही Vi मोबाइल अॅपमध्ये जावू करू शकता. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RJXpvt