Full Width(True/False)

कतरिनामुळे सरोज खान यांना मिळाला नव्हता सिनेमा

मुंबई- ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. गुरुवारी मध्यरात्री १ वाजून ५२ मिनिटांनी गुरुनानक इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून मधुमेहाचा आजार होता. सरोज खान यांनी त्यांच्या करिअरमध्ये २ हजारांहून अधिक गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन केलं. आतापर्यंत अनेक पुरस्कारही जिंकले. पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना फारसं काम मिळत नव्हतं. त्यांनी स्वतः हे मान्य केलं होतं की सिनेसृष्टीत त्यांना पाहिजे तसं काम मिळत नाही. कतरिना कैफला ठरवलं होतं जबाबदार- २०१८ मधील 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या बिग बजेट सिनेमात नृत्यदिग्दर्शन करण्यासाठी सरोज खान यांना विचारण्यात आलं होतं. या सिनेमात अमिताभ बच्चन, आमिर खान आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमात कतरिनावर एक खास गाणं चित्रीत करण्यात आलं होतं. सुरुवातीला हे गाणं कोरिओग्राफ करण्यासाठी सरोज यांना विचारण्यात आलं होतं. अनेक वर्षांनी सरोज यांना काम मिळालं होतं. पण हा सिनेमा त्या करू शकल्या नाहीत. त्यांनी यासाठी कतरिना कैफला जबाबदार मानलं होतं. सरोज यांचं काम प्रभूदेवाला देण्यात आलं सरोज खान यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'सध्याची डान्सची अवस्था पाहून डान्समध्ये सिनेसृष्टीसाठी काहीतरी चांगलं करू इच्छिते. मी कोणत्याही अभिनेत्रीला जज करत नाहीये. कारण मी फक्त त्यांना अशा गाण्यांमध्ये पाहिलं आहे ज्याची कोरिओग्राफी दुसऱ्यांनी केली. कतरिना चांगली दिसते आणि तिच्यासोबत 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये काम करण्याची संधीही मिळाली होती. पण जसं शूट सुरू होणार होतं, मेकर्सने सांगितलं की ती रिहर्सलशिवाय गाणं चित्रीत करणार नाही आणि माझं काम प्रभुदेवाला देण्यात आलं.' मग या सिनेमांमध्ये केलं काम- नंर सरोज खान यांनी कंगना रणौतसोबत मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी या सिनेमात काम केलं. त्यांनी 'राजाजी' गाणं कोरिओग्राफ केलं. यानंतर करण जोहरच्या मल्टीस्टारर 'कलंक' सिनेमात त्यांनी काम केलं. माधुरी दीक्षितवरील 'तबाह हो गए' गाण्याची कोरिओग्राफी त्यांनी केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ip9EcU