मुंबई टाइम्स टीम नाट्यप्रयोग थांबल्यामुळे हातचं काम गेलेला रंगमंच कामगार विजय गोळेसाठी हा दसरा आनंदाचा ठरणार आहे. रंगमंच कामगारांच्या समस्यांना वाचा फोडणारी बातमी 'मुंबई टाइम्स'नं काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत दिग्दर्शक आणि कार्यकारी निर्माते रत्नकांत जगताप यांनी विजयला '' या मालिकेच्या सेटवर काम करण्याची संधी दिली. विजयबरोबरच आणखी काही रंगमंच कामगारांनाही मालिकेसाठी काम देण्यात आलं आहे. त्यामुळे या सर्वांसाठी येणारे सणासुदीचे दिवस आनंदाचे जाणार आहेत. लॉकडाउनच्या दिवसांमध्ये चालवण्यासाठी रंगमंच कामगार विजय गोळेनं मुंबईमध्ये दिवस-रात्र टॅक्सी चालवायला सुरुवात केली. नाट्यप्रयोग होत नसल्यानं त्याच्या हाती टॅक्सीचं स्टिअरिंग व्हिल आलं होतं. या रंगमंच कामगारांच्या आर्थिक विवंचनेची, कठीण परिस्थितीची दखल घेणारी बातमी 'मुंबई टाइम्स'नं प्रसिद्ध केली. होत. ही बातमी वाचल्यानंतर मालिकेच्या सेटवर त्याला काम देण्यात आलं. विजय मराठी नाटकांसाठी बॅकस्टेज व्यवस्थापनचं काम करतो. त्याबरोबरच हिंदी, गुजराती रंगभूमीवरील 'सही रे सही' नाटकाच्या प्रकाशयोजनेचं काम देखील तो करायचा. गेले सात वर्ष तो मनोज जोशी यांच्या 'चाणक्य' नाटकाची प्रकाशयोजना सांभाळतोय. आता तो पुन्हा एकदा आपल्या कामाकडे वळू शकला आहे. मालिकेच्या सेटवर बंटी काळे, किरण पाटील, कल्पेश कान्हेरे, अमित शिर्के या रंगमंच कामगारांनादेखील कामाची संधी मिळाली आहे. लॉकडाउनच्या दिवसात माझ्यासारख्या रंगमंच कामगारांच्या व्यथांची दखल 'मुंबई टाइम्स'नं घेतली. आज नाटक नाही, पण नवीन मराठी मालिका 'सुखी माणसाचा सदरा'च्या चित्रीकरणाच्या सेटवर मला काम मिळालं आहे. त्यासाठी मी 'मुंटा'चे आभार मानतो. -विजय गोळे


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34tXnPD