Full Width(True/False)

'इश्कबाज' अभिनेत्री नीति टेलरनं उरकलं गुपचूप लग्न;फोटो व्हायरल

मुंबई: '' या हिंदी मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री हिनं चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. नीतिनं तिच्या लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नितीनं १३ ऑगस्ट रोजीच प्रियकर याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. नीति आणि परीक्षित गेल्या दोन वर्षापासून रिलेशनशीपध्ये होते. करोना आणि लॉकडाऊनचे नियम असल्यानं दोघं गुरुग्राम येथील एका गुरुद्वारामध्ये लग्नबंधनात अडकले. एका मुलाखतीत नीतिनं तिच्या लग्नाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ६ ऑगस्टरोजी आम्ही १३ ऑगस्टला लग्न करूया, असं ठरवलं होतं. अवघ्या एका आठवड्यात आम्ही लग्नाची सगळी तयारी केल्याचं तिनं सांगितलं.गेल्या वर्षी नीति आणि परीक्षित यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर चाहते याच्या लग्नाची वाट पहात होते. दोघांच्या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. २००९मध्ये आलेल्या 'प्यार का बंधन' या मालिकेतून नीतिनं सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यांनंतर ती 'कैसी ये यारियां', 'गुलाम' या मालिकांमध्ये झळकली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36yoaM5