Full Width(True/False)

सई ताम्हणकर , प्रिया बापट... मराठी अभिनेत्रींनी वळवला व्यवसायाकडे मोर्चा

अभिनय क्षेत्रात ठसा उमटवल्यानंतर अनेक कलाकार वेगवेगळ्या व्यवसायात पाऊल टाकताना दिसताहेत. त्यात प्रामुख्यानं फॅशनविश्वाशी संबंधित व्यवसायांचा समावेश आहे. दसऱ्याचं निमित्त साधून अभिनेत्री आणि यांनी आपल्या नव्या व्यवसायाच्या घोषणा केल्या. त्यामुळे मराठी कलाकारांचे नवे व्यवसाय, त्यात त्यांना मिळणारं यश चर्चेत आलं आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील फॅशन आयकॉन म्हणून प्रसिद्ध असलेल्या सई ताम्हणकरनं 'द सारी स्टोरी' नावाचा साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. जवळची मैत्रीण श्रुतीसह तिनं या व्यवसायात पदार्पण केलं आहे. अभिनेत्री प्रिया बापटनं आपल्या साडीप्रेमाचं रुपांतर व्यवसायात केलं आहे. तिनं आपल्या बहिणीसोबत 'सावेंची' नावाचा साड्यांचा ब्रँड सुरू केल्याची घोषणा केली आहे. अभिनेत्री क्रांती रेडकरनं एका ब्रेकनंतर उद्योजिका म्हणून एंट्री केली. तिचा '' हा कपड्यांचा ब्रँड असून क्रॅकर हा दागिन्यांचाही ब्रँड प्रसिद्ध आहे. दोन्ही व्यवसायांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या दोघींनी मिळून सुरू केलेल्या 'तेजाज्ञा' प्रसिद्ध झाला आहे. तसंच ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा 'हंसगामिनी' नावाचा ब्रँड आहे. 'ओळखीचे चेहरे आणि कलाकार म्हणून असलेली पोहोच याचा फायदा होतो. याच क्षेत्रातल्या आमच्या मित्र-मंडळींकडून प्रोत्साहन मिळतं. त्याचा व्यवसायावर सकारात्मक परिणाम होतो. सामान्य लोकांच्या तुलनेत आम्हाला आमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवणं काहीसं सोपं असतं. पण, प्रचंड मेहनत आहे', असं अभिनेत्री आरती वडगबाळकर सांगते. तिचा 'कलरछाप' नावाचा कपड्यांचा ब्रँड आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा 'अपूर्वा कलेक्शन' तर सई लोकूरचा 'सांझ' नावाचा दागिन्यांचा ब्रँड आहे. कलाकार म्हणून आमच्यावर असलेल्या विश्वासाचा फायदा व्यवसायाला होतो. शिवाय, कलाकाराचा ब्रँड म्हटल्यावर गुणवत्ता किंवा दर्जा याबद्दल लोकांना खात्री वाटते. शिवाय, खिशाला परवडणारी उत्पादनं आणली की तिची विक्री होतेच. -क्रांती रेडकर


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jvsxKz